मांग-गारोडी समाजातील मुलीची उंच भरारी

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 26 ऑगस्ट 2018

वर्धा - प्रबळ इच्छाशक्‍ती, आत्मविश्‍वास व मेहनत करण्याची तयारी असेल तर वंचित घटकातील विद्यार्थी यशाचे शिखर गाठू शकतो. येथील मांग-गारोडी समाजातील नंदनी नाडे हिने हे दाखवून दिले. तिने डॉक्‍टरची पदवी प्राप्त केली आहे. मांग-गारोडी समाजात डॉक्‍टर होणारी ती भारतातील पहिलीच मुलगी आहे.

नंदनीने शरद पवार दंत महाविद्यालयात शिक्षण घेतले. माजी खासदार दत्ता मेघे, सागर मेघे यांनी माझ्या मुलीच्या शिक्षणासाठी मदत केली. त्यामुळेच ती मांग-गारोडी समाजातील भारतातील पहिली डॉक्‍टर झाली, असे वडील ओंकार नाडे यांनी सांगितले. यापूर्वी मांग-गारोडी समाजातील सुजिता नाडे व सोनू नाडे यांनी हवाई सुंदरीचे प्रशिक्षण घेतले आहे. ओंकार नाडे यांनी मुलींना शिकविण्यासाठी जिवाचे रान केले. श्रीरामपूर येथे फुटपाथवर बांगड्यांचा व्यवसाय सुरू केला. व्यवसाय करून आल्यानंतर रात्री हॉटेलमध्ये काम केले. 
फुटपाथवर पुस्तके, पेन आदी साहित्य विक्री केली. नंतर किराणा दुकान व व्हिडिओ लायब्ररीचे अशोकनगर येथे दुकान लावले. यानंतर शहरात इलेक्‍ट्रॉनिक्‍स वस्तू विक्रीचे दुकान लावले. मांग-गारोडी समाज हा शिक्षणापासून कोसोदूर आहे, याची खंत त्यांना नेहमीच वाटायची. 

त्यांनी आपल्या मुलीला डॉक्‍टर करण्याचे ठरविले. मुलीनेही वडिलांचे स्वप्न पूर्ण केले. शिक्षणासाठी मदत करणारे माजी खासदार दत्ता मेघे यांचा पूजा नाडे यांनी शाल, श्रीफळ देऊन सत्कार केला. तिचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mang garodi Society Girl Nandani Gade Doctor Success Motivation