शीतलच्या शिक्षणासाठी मराठा क्रांती मोर्चाची मदत

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 सप्टेंबर 2018

वडवणी (जि. बीड) - साळिंबा (ता. वडवणी) येथे सरस्वती जाधव यांनी मुलीच्या शिक्षणासाठी पैसै नसल्याने 21 ऑगस्टला आत्महत्या केली होती. मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आबासाहेब पाटील यांनी रविवारी जाधव कुटुंबीयांची भेट घेतली व सरस्वती यांची मुलगी शीतल हिच्या वैद्यकीय शिक्षणासाठी मदतीचे आश्‍वासन दिले.

"मराठा तरुणांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, आपल्या आई-वडिलांचा संघर्षाचा विचार करावा', असे आवाहन करीत शीतलच्या शिक्षणाचा पूर्ण खर्च मराठा क्रांती मोर्चा करेल, असे आश्‍वासन पाटील यांनी दिले. "आईच्या आत्महत्येमुळे मी खचून गेले होते; मात्र आबासाहेब पाटील आणि सर्व सहकाऱ्यांनी मला मुलीचा दर्जा दिला आणि जबाबदारी घेतली, त्यामुळे जगण्यासाठी नवे पंख मिळाले,' अशी भावना शीतल जाधव हिने व्यक्त केली. दरम्यान, पाटील यांनी मामला येथील आत्महत्या करणाऱ्या दत्ता लंगे यांच्या कुटुंबीयांच्या घरी जाऊन त्यांना आर्थिक मदतही केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha Kranti Morcha Help to Shital jadhav for Education