हिंदी भाषिक मुलांमध्ये राऊळकर रुजविताहेत मराठी

मंगेश गोमासे
शनिवार, 10 फेब्रुवारी 2018

नागपूर : मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी वारंवार होत असताना, तिच्या संवर्धनाकडे दुर्लक्ष होते. राजकीय संघटना प्रत्यक्षात मराठी भाषेच्या संवर्धनासाठी किती कामे करतात, याबद्दल सांगता येणे कठीण आहे. मात्र, जिल्हा परिषदेतील सविता राऊळकर या शिक्षिका आपल्या उपक्रमातून शाळेतील हिंदी भाषिक मुलांनाच मराठीचे धडे देत, मराठी भाषा रुजविण्याचे काम करीत आहे. विशेष म्हणजे त्यांचा हा उपक्रम जिल्हास्तरावर राबविल्या जात आहे. 

नागपूर शहरासह जिल्हा पूर्वी सी. पी. ऍण्ड बेरार प्रांतात असल्याने येथील नागरिकांवर हिंदीचा बराच प्रभाव आहे. विशेष म्हणजे शहरालगतच्या परिसरात छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातून येणारे नागरिक स्थायिक झाले आहेत. विशेष म्हणजे बेसासारख्या परिसरात बहुभाषिक नागरिकांचा समावेश आहे. त्यांची मातृभाषा हिंदी आणि इतर भाषा असल्याने बेसा परिसरात असलेल्या जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत त्यांना शिकविण्यात बरीच अडचण निर्माण यायची. विशेष म्हणजे बहुभाषिक विद्यार्थ्यांना मराठीतून शिकविण्याचे आव्हान बरेच मोठे आहे. ही अडचण लक्षात घेता, मुख्याध्यापक चांदगीरकर आणि केंद्रप्रमुख के. पी. दिघोरे यांच्या मार्गदर्शनात सविता राऊळकर यांनी "चला मराठीशी मैत्री करू या' या उपक्रमाची सुरुवात केली.

उपक्रमात साधे आणि सोपे वाक्‍य तयार करून त्याबद्दल उजळणी घेणे, गाणे, कृतीतून वाक्‍य बोलून दाखविणे आदी उपक्रम राबविले. त्यातून बरेच हिंदी भाषिक मुले अगदी स्पष्ट उच्चारासह मराठी बोलण्यास शिकले. राऊळकर यांनी हा प्रकल्प गतवर्षी जिल्हास्तरावर सादर केला. जिल्हास्तरावर त्यांच्या प्रकल्पाची निवड करण्यात आली. आता हा प्रकल्प संपूर्ण जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये राबविण्यात येत आहे. 

हिंदी भाषिकांमध्ये मराठी रुजविणे बरेच कठीण आहे. मात्र, प्रकल्पातून राबविलेल्या विविध उपक्रमांतून ते शक्‍य झाल्याचा आनंद आहे. यासाठी मुख्याध्यापक आणि केंद्रप्रमुखांचेही मार्गदर्शन मोलाचे ठरले आहे. 
- सविता राऊळकर, शिक्षिका, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, बेसा

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Nagpur news Positive news Marathi Education Savia Raulkar