नवदांपत्याचा अवयवदानाचा संकल्प

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 15 मार्च 2018

सातारा - अवयव दान हे रक्तदानाइतकेच सर्वश्रेष्ठ दान आहे. आपल्या अवयव दानाने एखाद्याला नवजीवन मिळू शकते. हाच विचार घेऊन घाडगेवाडी (ता. फलटण) येथे नुकत्याच झालेल्या विवाह समारंभात वर धैर्यशील लोखंडे आणि वधू डॉ. शुभांगी घाडगे यांनी अवयवदानाचा संकल्प जाहीर केला. त्याबाबतचे फॉर्म भरून त्यांनी कोमल न्यू लाइफ फाउंडेशनकडे दिले.

ढवळ (ता. फलटण) येथील अभियंते धैर्यशील लोखंडे आणि नवी मुंबई येथील डॉ. शुभांगी पांढरे यांचा घाडगेवाडी येथे विवाह झाला. विवाहाची धांदल, वाजंत्र्यांचा गजर सुरू असतानाच वधू- वरांनी आपण अवयवदान करणार असल्याचे जाहीर केले. या वेळी सर्व वऱ्हाडींनी टाळ्यांचा कडकडाट केला. साताऱ्यातील धीरज गोडसे व त्यांची पत्नी कोमल यांनी कोमल न्यू लाइफ फाउंडेशनची स्थापना केली आहे. यामधील कोमल या काही काळापूर्वी आजारी होत्या. त्यांना हृदय आणि फुफ्फुसे बसविणे गरजेचे होते. त्या वेळी त्यांना अवयवदानातून मिळालेले हृदय आणि दोन फुफ्फुसे बसविली आहेत. त्यामुळे त्यांना नवजीवन मिळाले आहे. 

समाजाच्या या ऋणातून उतराई होण्यासाठी त्यांनी अवदानासाठी कार्य करण्याचे ठरविले. त्यातून त्यांनी फाउंडेशनची स्थापना केली. या फाउंडेशनच्या माध्यमातून ते अवयवदानाबाबत समाजात जागृती करत आहेत. वर धैर्यशील लोखंडे हे ही या फाउंडेशनचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. त्यांनी आपला अवयवदानाचा विचार, महत्त्व नियोजित पत्नी डॉ. शुभांगी यांना सांगितले आणि त्याही अवदानासाठी तयार झाल्या, अशी माहिती फाउंडेशनचे सचिव धीरज गोडसे यांनी दिली. आणि या वधू- वरांनी विवाह समारंभातच अवयवदानाचा संकल्प जाहीर केला.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news satara news couple body organ donate