सोसायटीत बहरला गांडूळ खतावर झेंडू

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 27 जून 2018

वडगाव शेरी - विमाननगरमध्ये लुंकड बेलवेडर सोसायटीत बहरलेली टपोरी झेंडूची फुले लक्ष वेधून घेत आहेत. सोसायटीतील गांडूळ खताने ही किमया साधली असून, झेंडूच्या गोंड्याचा व्यास अकरा सेंटीमीटर, तर वजन सरासरी पंच्याहत्तर ग्रॅम आहे.

या विषयी माहिती देताना सोसायटीचे बागकाम पाहणारे दत्ता निकाळजे म्हणाले, ‘‘येथे गांडूळ खत वापरले. चांगली निगा ठेवली. त्यामुळे झेंडूचा गोंडा मोठा झाला. कोलकत्ता हायब्रीड या जातीच्या झेंडूच्या गोंड्याचा आकार तळहाता एवढा आहे. राहुल डागलिया यांच्या मार्गदर्शनाखाली सोसायटी आणि पुणे महापालिकेच्या विमाननगर येथील उद्यानातही हा झेंडू लावला आहे. काही दिवसांत तेथेही झेंडू बहरलेला दिसून येईल.’’

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Marigold on Vermicompost fertilizer positive story

टॅग्स