ट्रेकर्सनी स्वखर्चाने रस्ता केला दुरुस्त

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 30 नोव्हेंबर 2017

म्हसवड - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जांभुळणी व त्यापुढे डोंगर माथ्यावरील श्री भोजलिंग देवस्थानला जोडला जाणारा रस्ता दुरुस्त करण्यासाठी ट्रेकर्सनी पुढाकार घेतला. प्रत्येक रविवारी ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या येथील ट्रेकर्सनी स्व खर्चाने हा रस्ता दुरुस्त करून तो जांभुळणीचे ग्रामस्थ व यात्रेकरूंना वाहतुकीस सुरक्षित करून दिला.

म्हसवड - जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत जांभुळणी व त्यापुढे डोंगर माथ्यावरील श्री भोजलिंग देवस्थानला जोडला जाणारा रस्ता दुरुस्त करण्यासाठी ट्रेकर्सनी पुढाकार घेतला. प्रत्येक रविवारी ट्रेकिंगसाठी जाणाऱ्या येथील ट्रेकर्सनी स्व खर्चाने हा रस्ता दुरुस्त करून तो जांभुळणीचे ग्रामस्थ व यात्रेकरूंना वाहतुकीस सुरक्षित करून दिला.

म्हसवडच्या उत्तरेस सुमारे १४ किलोमीटर अंतरावर चार हजार लेकवस्तीचे जांभुळणी गाव आहे. या गावातूनच पुढे हा रस्ता सुमारे चार किलोमीटर अंतरावर उंच डोंगरावर वसलेल्या श्री. भोजलिंग देवस्थानच्या पुरातन मंदिराकडे जातो. या देवस्थानच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांची संख्या मोठी आहे. येथील यात्रेतील श्री सिद्धनाथ देवस्थानच्या रथ मिरवणुकीत जांभुळणीहून भोजलिंगाची मानाची सासणकाठी रथाच्या भेटीस मुक्कामी येते. म्हसवडची यात्रा संपताच पुन्हा या सासनकाठ्या जांभुळणीस १४ किलोमीटर पायी चालत मिरवणुकीने जांभुळणीस पोचताच या काठीची मिरवणूक काढून यात्रा भरते. या यात्रेस व डोंगरावरील भोजलिंगाचे दर्शनासाठी हजारोंच्या संख्येने भाविक येतात. भाविक व परिसरात राहणाऱ्या ग्रामस्थांना रस्त्याच्या दुरवस्थेमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागत होता. या रस्त्याच्या दुरुस्तीची मागणी अनेक वर्षांपासून होत होती; परंतु या नेत्यांना व बांधकाम विभागालाही काहीच सोयरसुतक नसल्याचे निदर्शनास येत होते. निवडणूक काळात लोकप्रतिनिधींनी दिलेल्या आश्‍वासनांचाही विसर पडला होता. भोजलिंग यात्रेस येणाऱ्या भाविकांना रस्त्यावरील असंख्य खड्डे, रस्त्याच्या बाजूला फूट- दीड फूट खचून गेलेल्या साइडपट्ट्या व रस्त्याच्या दोन्ही बाजूला झुडपातून मार्ग काढत वाहनधारकांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत होते. विजय सिन्हा, युवराज सूर्यवंशी, डॉ. चेतन गलांडे, डॉ. जितेंद्र तिवाटणे, अजित सूर्यवंशी, राजकुमार सूर्यवंशी, श्रावण पडळकर, पिंटू पिसे, प्रदीप तावरे, माजी सैनिक बापू जावीर, संतोष शेट्टी, सोमनाथ केवटे, विश्वजित देशमुख, संजय भागवत, सचिन मंगरुळे आदी ट्रेकर्सनी रस्त्याची वस्तुस्थिती पाहिली व या सर्वांनी स्वखर्चाने हा रस्ता दुरुस्त करून दिला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mhaswad satara news Trackers has done the road to self expenditure