मजुरी करून बनला अधिकारी

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 26 नोव्हेंबर 2018

किल्लारी - एखाद्या सरकारी विभागात नोकरीस असलेल्या पालकाचा मुलगा पोलिस उपनिरीक्षक झाल्यास काही विशेष वाटत नाही. मात्र किल्लारीपासून एक किलोमीटरवर असलेल्या नदीहत्तरगा येथील एका मजुराच्या मुलाने मजुरी करून जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर पोलिस उपनिरीक्षक पद मिळवले आहे. या तरुणाचे कष्ट पाहणाऱ्या ग्रामस्थांना याचे विशेष कौतुक असून नुकताच ग्रामस्थांच्या वतीने मिलिंद सोनकांबळे यांचा सत्कार करण्यात आला.

वडिलांचा शेती आणि मजुरीचा व्यवसाय, घरची दोन एकर शेती. त्यातही काही पिकत नाही. जे पिकते ते पुरत नाही. अनेकवेळा मजुरीसाठी वडिलांबरोबरही जावे लागे. शाळा, कॉलेज आणि स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करण्यासह मजुरीही करावी लागली. 

जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर मिलिंद सोनकांबळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची वर्ष २०१६-१७ ची परीक्षा उत्तीर्ण होऊन पोलिस उपनिरीक्षक पदासाठी पात्र ठरले. नांदेड रेल्वे विभागात बुधवारी (ता. २१) ते पोलिस उपनिरीक्षकपदी रुजू झाले आहेत. त्यांच्या या यशाबद्दल ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. 

सरपंच काशीनाथ राजे, पोलिस पाटील किशन खोबरे, विविध कार्यकारी सेवा सोसायटीचे चेअरमन भागवत शेटकार,  प्रशांत मस्के, मुख्याध्यापक अन्वर पटेल, राजू घोडके, खलील मुल्ला, हरीश डावरे, बापूराव कुन्हाळे यांची उपस्थिती होती.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Milind Sonkambale Labour to Police Officer Success Motivation