ऑनलाइन शिक्षणासाठी खुस्पे दाम्पत्याचे दातृत्व

सचिन शिंदे
Sunday, 11 October 2020

कोरोनामुळे सर्व घडी विस्कटली आहे. या संसर्गजन्य रोगावर लस उपलब्ध नाही. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग एवढाच सध्यातरी पर्याय आहे. त्यामुळे सध्या शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात ठेवण्यासाठी शिक्षण विभागाकडून ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आला आहे. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे.

कऱ्हाड (जि. सातारा) : ओंड येथील एका विद्यार्थिनीने मागील आठवड्यात ऑनलाइन शिक्षणासाठी मोबाईल नव्हता म्हणून आत्महत्या केली. ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. त्याचा विचार करून विद्यार्थ्यांच्या ऑनलाइन शिक्षणासाठी नवीन सहा मोबाईल प्रा. महेश खुस्पे आणि मंजिरी खुस्पे यांनी पंचायत समितीच्या शिक्षण विभागाकडे सुपूर्द केले. 

कोरोनामुळे सर्व घडी विस्कटली आहे. या संसर्गजन्य रोगावर लस उपलब्ध नाही. त्यामुळे सोशल डिस्टन्सिंग एवढाच सध्यातरी पर्याय आहे. त्यामुळे सध्या शाळा बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रवाहात ठेवण्यासाठी शिक्षण विभागाकडून ऑनलाइन शिक्षणावर भर देण्यात आला आहे. मात्र, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची मोठी अडचण झाली आहे. अनेकांकडे अजूनही मोबाईल नाहीत, कोणाला रेंज नाही, कोणाकडे ऍन्ड्राईड मोबाईल नाहीत, त्यामुळे त्यांचे शिक्षण थांबले आहे. 

व्यवसायच बंद, मग पैसे फेडणार कुठून?, चौपाटी व्यावसायिकांची खदखद

त्यातूनच ओंड येथील एका विद्यार्थिनीने मध्यंतरी अभ्यासासाठी मोबाईल मिळत नाही म्हणून आत्महत्या केली. त्या घटनेने जिल्हा सुन्न झाला होता. ती घटना प्रा. खुस्पे व सौ. खुस्पे यांना समजल्यावर त्यांना फार दुःख झाले. अशा विद्यार्थ्यांसाठी काहीतरी देणे लागतो, याचा विचार करून त्यांनी नवीन सहा मोबाईल फोन खरेदी केले. त्याचबरोबर त्यांच्याकडील कमी वापरलेले दोन मोबाईल फोन माध्यमिक शिक्षणाधिकारी राजेश क्षीरसागर यांच्याशी चर्चा करून कऱ्हाड पंचायत समितीकडे सुपूर्द केले. पंचायत समितीचे उपसभापती रमेश देशमुख, गटशिक्षणाधिकारी शबनम मुजावर यांच्याकडे यांनी त्याचा स्वीकार केला. पंचायत समिती सदस्य ऍड. पोळ, विस्तार अधिकारी नितीन जगताप, श्रीमती मुलाणी, पोषण आहार अधिकारी परीट उपस्थित होते. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mobile Provided By Khuspe Family For Online Education At Karad Satara News