आईने दिले मुलाला मूत्रपिंड

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 11 ऑगस्ट 2018

पुणे - सलग वीस वर्षे मूत्रपिंडाच्या विकाराशी लढणाऱ्या तरुणाला त्याच्या आईने मूत्रपिंड दान केले. त्यामुळे तरुणाला जीवदान मिळाले आहे. हडपसर येथील महंमदवाडीमध्ये राहणाऱ्या फल्ले कुटुंबातील मयूरवर ही शस्त्रक्रिया करण्यात आली. त्याचे वडील सुरक्षारक्षक म्हणून काम करतात. खासगी रुग्णालयातील मूत्रपिंड प्रत्यारोपणाचा खर्च त्यांना परवडणारा नव्हता. त्यामुळे ही शस्त्रक्रिया ससून रुग्णालयात करण्यात आली. 

बी. जे. वैद्यकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले म्हणाले, ‘‘ससून रुग्णालयातील ही आठवी मूत्रपिंड प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे. मूत्रपिंड प्रत्यारोपणासारखी आव्हानात्मक शस्त्रक्रिया यशस्वी करण्यापर्यंत ससून रुग्णालयातील वैद्यकीय सेवांचा दर्जा वाढला आहे. डॉ. सुरेश पाटणकर, डॉ. अभय सदरे, डॉ. धनेश कामेरकर, डॉ. सुरेखा शिंदे, डॉ. योगेश गवळी यांनी ही शस्त्रक्रिया केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mother kiddney give to son humanity motivation