मार्गदर्शक शिक्षिकेला ग्रामस्थांकडून मोटार

मार्गदर्शक शिक्षिकेला ग्रामस्थांकडून मोटार

शिक्रापूर - पिंपळे-खालसा (ता. शिरूर) येथील जिल्हा परिषद शाळेतील १९ विद्यार्थी इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले. यामुळे ग्रामस्थांनी मार्गदर्शक शिक्षिका ललिता अशोक धुमाळ यांना मोटार भेट दिली. बाईंनीही तीन विद्यार्थ्यांना मनगटी घड्याळे भेट दिली. 

पिंपळे-खालसा शाळेतील १९७१ पासून आत्तापर्यंत जवळपास ४५० विद्यार्थी जिल्हा गुणवत्ता यादीत चमकले. या वर्षी इयत्ता पाचवीतील १९ पैकी ३ विद्यार्थी राज्य गुणवत्ता यादीत चमकले, तर उर्वरित जिल्हा गुणवत्ता यादीत. ग्रामस्थांनी २०११ पासून शिक्षकांना चारचाकी व दुचाकी देण्याची प्रथा सुरू केली असून, आत्तापर्यंत तीन दुचाकी व पाच चारचाकी गाड्या भेट देण्यात आल्या. या वर्षी इयत्ता पाचवीच्या मार्गदर्शक शिक्षिका ललिता धुमाळ यांना चारचाकी भेट दिली, तर बाईंनीही राज्य गुणवत्ता यादीत चमकलेल्या तीन विद्यार्थ्यांना प्रत्येकी एक मनगटी घड्याळ भेट दिले. याच कार्यक्रमात कोयाळी-पुनर्वसन शाळेतील रोहिणी वसंत धुमाळ या शिक्षिकेचाही सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाला शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष ज्ञानेश्वर धुमाळ उपस्थिती होते. सूत्रसंचालन विलास पुंडे, तर आभार रामदास थोरात यांनी मानले.   

परीक्षेत यशस्वी विद्यार्थी
दरम्यान, इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांची नावे व कंसात गुण पुढील प्रमाणे ः ओम गणेश धुमाळ (राज्यात पाचवा, गुण २७२), हर्षदा राजेंद्र शितोळे (राज्यात नववी, २६६), गुरुदत्त माऊली धुमाळ (राज्यात दहावा, २६४), प्रणव सुभाष धुमाळ (२५८), अजय युवराज झेंडे (२५४), वैष्णवी अण्णासाहेब धुमाळ (२५४), जय रोहिदास धुमाळ (२५२), सार्थक संजय सुरसे (२५०), जय गणेश धुमाळ व आशिष बापू दरेकर (२४८), गौरी मदन धुमाळ, काजल मारुती राऊत, अंजली संदीप शितोळे, हर्षदा सुनील नवगिरे  (२४४), प्राप्ती पांडुरंग धुमाळ (२४२), मोहिनी भाऊसाहेब गुळवे (२२६), ओम सतीश धुमाळ (२२०), हर्षद रंगनाथ जाधव (२१८), संकेत सुनील धुमाळ (२१२). 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com