रिक्षाचालकाकडून दीड लाखांचे दागिने परत

रिक्षाचालकाकडून दीड लाखांचे दागिने परत

घाटकोपर - प्रवासामध्ये अनेकदा आपल्या मौल्यवान वस्तू हरवतात किंवा आपण त्या एखाद्या ठिकाणी विसरतो. या हरवलेल्या किंवा विसरलेल्या वस्तू आपल्याला पुन्हा मिळतीलच याची शाश्‍वती फार कमी असते; पण अंधेरीतील एका महिलेला प्रजासत्ताकदिनी याबाबत एक वेगळाच अनुभव आला. साडेचार तोळ्याचे मंगळसूत्र व कपड्यांची बॅग ही महिला रिक्षामध्ये विसरली; मात्र रिक्षाचालकाने दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे तिला आपली बॅग व्यवस्थित मिळाली.

त्रिपुरारी सत्येंद्रनाथ सिंग असे या रिक्षाचालकाचे नाव आहे. अंधेरी एमआयडीसी परिसरातून रजनी शशिकांत कोलापटे यांनी प्रजासत्ताकदिनी अंधेरी रेल्वेस्थानकाकडे जाण्यासाठी त्रिपुरारीच्या रिक्षात बसल्या; मात्र अंधेरी रेल्वेस्थानक आल्यावर रजनी आपली बॅग रिक्षातच विसरून गेल्या. त्यानंतर त्रिपुरारी घराच्या दिशेने गेला. रिक्षा घराजवळ उभी करून तो घरी जाण्यास निघाला असता त्याला रिक्षामध्ये बॅग सापडली. त्रिपुरारीने बॅग तपासली असता त्यात कपडे व दागिने आढळून आले. त्यानंतर रिक्षाचालकाने रिक्षा थेट एमआयडीसी पोलिस ठाण्याकडे वळवून त्या महिलेची बॅग पोलिसांच्या ताब्यात दिली. रजनी कोलापटे यांनी आपल्या हरवलेल्या बॅगेची तक्रार अंधेरी पोलिस ठाण्यात नोंदवली होती. 

रजनी यांनी एमआयडीसी परिसरात रिक्षा पकडलेली असल्याने अंधेरी पोलिसांनी याबाबत एमआयडीसी पोलिस ठाण्याकडे विचारणा केली. यावर एमआयडीसी पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षकांनी रजनी यांची बॅग पोलिस ठाण्यात रिक्षाचालकाने आणून दिल्याचे सांगितले. त्यावर एमआयडीसी पोलिसांनी रजनी यांना ठाण्यात बोलावून घेतले. त्यानंतर रजनी यांची चौकशी करत त्यांचे दागिने व बॅग त्यांच्या स्वाधीन केले. रिक्षाचालक त्रिपुरारी सिंगने प्रामाणिकपणा दाखवल्याबद्दल वरिष्ठ पोलिस निरीक्षक शैलेश पासलवार यांनी त्याचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com