हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रियेची 'पन्नाशी'

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 31 मे 2017

मुंबई - महिलेचा मेंदू मृत झाल्याचे घोषित केल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी सोमवारी रात्री अवयवदानाचा निर्णय घेतला. 55 वर्षांच्या या महिलेचे हृदय साताऱ्यातील 32 वर्षांच्या तरुणाला देण्यात आले. महाराष्ट्रातील ही 50 वी हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया आहे.

या अवयवदानासाठी डॉ. संजय ओक यांनी प्रयत्न केले. डॉ. ओक या महिलेचे शेजारी असल्याने त्यांनी पुढाकार घेतला. पहिली हृदय प्रत्यारोपण शस्त्रक्रिया ऑगस्ट 2015मध्ये बदलापूर येथे राहणाऱ्या तरुणावर करण्यात आली होती. मुंबईत सोमवारी झालेले अवयवदान या वर्षातील 21 वे आहे. या महिलेचे यकृत 60 वर्षांच्या कोलकत्यातील महिलेला आणि मूत्रपिंड ठाण्यातील तरुणाला देण्यात आले. डोळे नेत्रपेढीत ठेवण्यात आले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: mumbai news heart transplant surgery