मृत्यूला कवटाळताना मड्डरू श्रीनिवासल्लू यांचे अवयवदान

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 4 डिसेंबर 2017

नागपूर - मृत्यूला कवटाळताना अर्थात मेंदूमृत्यू (ब्रेन डेड) असलेल्या सत्तेचाळीस वर्षीय व्यक्तीने यकृत आणि दोन किडनी दान केले. या अवयवदानातून तिघांना जीवनदान मिळेल. रविवारी उभारलेल्या सातव्या ग्रीन कॉरिडॉरमुळे यकृत निकामी झाल्याने मृत्यूच्या दारात उभ्या औरंगाबादेतील एका व्यक्तीसह आणखी दोन जणांना किडनी प्रत्यारोपणातून जीवनदान मिळणार आहे. 

मड्डरू श्रीनिवासल्लू असे मेंदूमृत्यू असलेल्या अवयवदात्याचे नाव आहे. ते व्यवसायाने सिव्हिल कॉन्ट्रॅक्‍टर होते. मूळचे आंध्र प्रदेशातील नेल्लूर येथील रहिवासी. पक्षघाताचा झटका आल्यामुळे त्यांना १९ नोव्हेंबरला न्यूरॉन हॉस्पिटलमध्ये भरती केले.

प्रसिद्ध मेंदूरोग शल्यचिकित्सक डॉ. चंद्रशेखर पाखमोडे यांनी त्यांच्या मेंदूवर शल्यक्रिया केली. श्रीनिवासल्लू यांच्या मेंदूच्या पेशी मृत पावल्याचे निदान करण्यात आले. दरम्यान, श्रीनिवासल्लू यांच्या अवयवांचे दान करण्यासंदर्भातील समुपदेशन डॉक्‍टरांनी केले. नातेवाइकांनी अवयवदानाला होकार दिल्यानंतर ऑरेंजसिटी रुग्णालयातील अवयव प्रत्यारोपण तज्ज्ञ डॉ. शिवनारायण आचार्य यांना सूचना दिली. रविवारी सकाळी सव्वाअकराच्या सुमारास रुग्णाला न्यूरॉनमधून ऑरेंजसिटीत हलविण्यात आले. मेंदू मृत्यू घोषित करणाऱ्या समितीला बोलविले. डॉ. देवयानी बुचे, डॉ. विश्वास दशपुत्रा, डॉ. वसंत डांगे यांच्या टीमने रुग्णाच्या मेंदूमृत्यू झाल्याच्या निदानावर शिक्कामोर्तब केले. विभागीय अवयव प्रत्यारोपण समितीचे अध्यक्ष डॉ. विभावरी दाणी, सचिव डॉ. रवी वानखेडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनी केंद्रीय अवयव प्रत्यारोपण समितीला माहिती दिली. औरंगाबादेतून यकृत प्रत्यारोपण तज्ज्ञ आपल्या पथकासह विमानाने सायंकाळी सातच्या सुमारास नागपूर विमानतळावर दाखल झाले. रुग्णालयाचे संचालक डॉ. अनुप मरार यांच्या नेतृत्वाखाली डॉ. सुहास साल्पेकर, डॉ. स्वीटी पारसी, डॉ. राजेश सोनी, डॉ. स्मिता हरकरे, डॉ. संदीप देशमुख, डॉ. निता देशपांडे, डॉ. अनिता पांडे, डॉ. एस. जे. आचार्य यांच्या पथकाने अवयव प्रत्यारोपणासाठी मदत केली. श्रीनिवासल्लू यांची एक किडनी ऑरेंज सिटी रुग्णालयात भरती असलेल्या एका तरुणाला प्रत्यारोपित करण्यात येईल. तर एक किडनी केअर रुग्णालयातील महिलेला देण्यात येणार आहे. 

रात्री सव्वानऊ वाजता थांबली उपराजधानी
अवयवदानाचे पुण्यकर्म करताना मागील दोन महिन्यांत सातवेळा उपराजधानीतील रस्त्यावरील वाहतूक थांबली. रस्त्यावरील वाहनधारकांना सुसाट वेगाने पळत येणारी ॲम्बुलन्स दिसताच सारे एकाच ठिकाणी स्तब्ध झाले. शहर वाहतूक शाखेचे पोलिस उपायुक्त रवींद्र परदेसी यांच्या नेतृत्वाखाली बुधवारी बजाजनगर पोलिस ठाण्याचे निरीक्षक ज्ञानेश्वर पाटील, पोलिस निरीक्षक (वाहतूक) जयेश भांडारकर यांच्या पथकाने वाहतूक नियंत्रित केली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur news body part donate by maddaru shrinivasallu