दिव्यांगांच्या जागतिक जलतरण स्पर्धेत कांचनमालाला सुवर्णपदक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 8 डिसेंबर 2017

नागपूर - नागपूरची दिव्यांग जलतरणपटू कांचनमाला पांडे-देशमुखने मेक्‍सिको येथे सुरू असलेल्या दिव्यांगांच्या जागतिक जलतरण स्पर्धेत महिलांच्या २०० मीटर वैयक्‍तिक मेडले प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. स्पर्धेत भारतासाठी तिने मिळविलेले हे पहिलेच सुवर्णपदक होय.

एस-११ कॅटेगरीत सहभागी झालेल्या कांचनमालाने अन्य प्रकारांत मात्र निराशा केली. १०० मीटर फ्रीस्टाइलमध्ये तिला चौथ्या, तर १०० मीटर ब्रेस्टस्ट्रोक आणि १०० मीटर बॅकस्ट्रोकमध्ये पाचव्या स्थानावर समाधान मानावे लागले. कांचनमालाने जुलैमध्ये बर्लिन येथे पार पडलेल्या स्पर्धेत पदक जिंकून जागतिक स्पर्धेसाठी पात्रता मिळविली होती. 

अमरावतीची रहिवासी असलेल्या कांचनमालाने आतापर्यंत आठवेळा विश्‍व, राष्ट्रकुल आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले आहे. ॲक्‍वा स्पोर्टस क्‍लबमध्ये सराव करणाऱ्या कांचनमालाने या कामगिरीचे श्रेय भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे अधिकारी पती विनोद देशमुख, एनआयएस प्रशिक्षक डॉ. प्रवीण लामखाडे, शशिकांत चांदे, विशाल चांदूरकर, फिजिओ डॉ. केविन अग्रवाल, डॉ. पी. के. देशपांडे, ट्रेनर सचिन देशमुख यांना दिले आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur news kanchanmala gold medal in handicapped global swimming competition