मोहफुले विकून शिकलेले रमेशभाऊ बनले सात शाळांचे संस्थापक

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 27 ऑगस्ट 2017

दोन हजार लोकांना दिला रोजगार

माढळ : नजीकच्या कुजबा या आम नदीकाठावर वसलेल्या खेडेगावात अठरा विश्वे दारिद्र्य असलेल्या फुले कुटुंबात 1958 साली रमेशभाऊंचा जन्म झाला. पोटाची खळगी भरण्यासाठी जगलातील मोहफुले व पाने गोळा करून विकले. पण शिक्षण सोडले नाही. उच्च शिक्षण, जिद्द, श्रमप्रतिष्ठेच्या बळावर रमेशभाऊंची आज नागपूर शहरात सात शाळा महाविद्यालये उभी आहेत.

रमेश बाबूराव फुले याचा जन्म कुही तालुक्यातील कुजबा या गावी झाला. सतरा सदस्य असलेल्या कूटुंबात रमेशभाऊ सर्वांत मोठा मुलगा पाच भाऊ व तीन बहिणींची जबाबदारी साभाळून शिक्षण करायचे म्हणजे तारेवरची कसरत होती. पण कष्टाळू व नम्रता तल्लख बुद्धीची चुणूक रमेशभाऊंनी लहापणीच दाखवत दहावीपर्यंतचे शिक्षण वेलतूर येथील विश्वव्यापी विद्यालात पूर्ण केले. या दरम्यान मिळेल ते काम त्यांनी केले. त्यावेळी कुजबा येथील उस्मानभाई कुरेशी याच्याकडे दोन रुपये मजुरीने काम केले. ते काम करताना किती रुपयांचे आहे यापेक्षा मी ते काम किती चांगले करू शकतो यात मला मला जास्त आनंद मिळायचा, असे ते सांगतात.

पुढे ते धनवटे महाविद्यालय नागपूर येथे पदवी व सी पी अँड बेरार येथून पदव्युत्तर व कायद्यातील पदवी संपादन केली. हे शिक्षण घेताणा नागपूर शहरात आलु कादे विकले कीराना दुकानदारी हमाली दलाली अशी कष्टाचे कामे करून स्वताचे शिक्षण लहान भाऊ व बहिणीची जबाबदारीही सांभाळून केले.

रमेशभाऊंचे कुटुंब दहा बाय दहाच्या खोलीत 'सोमवारी क्वार्टर्स' परिसरात भाड्याने रहायचे. आज रमेश फुले हे नाव उत्तर नागपूरमध्ये सुपरीचित आहेत. गरिबांना इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून भाऊ उत्तर नागपूर येथे प्रोग्रेसिव्ह कान्वेन्ट नार्थ पाईट स्कूल काश्मीर विद्याभवन अर्चना फुले हायस्कूल यशस्वी गरिबांना इंग्रजी माध्यमाचे दर्जेदार शिक्षण मिळावे म्हणून त्यांनी प्रयत्न केले. उत्तर नागपूर येथील प्रोग्रेसिव्ह कान्व्हेंट नार्थ पाईट स्कूल, कश्मीर विद्याभवन, अर्चना फुले हायस्कूल, यशस्वी पब्लिक स्कुल, अनुसया फुले विद्याभवन, ए.आर. फुले ज्युनियर कॉलेज, शरदचंद्र पवार वरिष्ठ महाविद्यालय नागपूरचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत. तसेच, सिक्युरिटी एजन्सी असून, पंधराशे गरजूंना रोजगार मिळवून दिला. पत्नी अर्चना याची साथ माझा कुटुंब परिवार व माझा मित्रपरीवार यांचे प्रेम मला नेहमीच प्रेरणादायक ठरतात, असे सांगतात. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nagpur news ramesh phule success story