ऑरगॅनिक पेस्टिसाइडच्या माध्यमातून अक्षय बनला सेंद्रिय शेतीदूत

हर्षदा देशपांडे
गुरुवार, 2 नोव्हेंबर 2017

नाशिक  - सध्याच्या शेतीत रासायनिक खते, जंतुनाशकांच्या अतिरिक्त वापरामुळे अनेकदा आरोग्याच्या समस्या निर्माण होताहेत. या उत्पादनांतून शेतजमिनीचा कसही बिघडतो. यावर मात करण्यासाठी सेंद्रिय शेतीला पूरक उत्पादने तयार करून ‘काळ्या आई’ला वाचविण्याचा प्रयत्न अक्षय संगपाळ करतोय. त्याचे हे संशोधन शेतकऱ्यांसाठी वरदान ठरत असल्याचे चित्र आहे. 

अक्षयने आरवायके विज्ञान महाविद्यालयातून वनस्पतिशास्त्र (बॉटनी) विषयातून पदवी शिक्षण घेतले. वाडिया महाविद्यालय, पुणे येथून त्याने प्लांट बायोटेक्‍नोलॉजी या विषयात एम.एस्सी. केले. वाडिया महाविद्यालयात अक्षयने संत्र्याच्या सालीपासून यिस्टच्या सहाय्याने बायोइथेनॉल तयार केले होते. 

त्याच्या वडिलांची अलर्ट बायोटेक्‍नोलॉजी नावाची खतांची कंपनी होती. त्यातच त्याने आपल्या शिक्षणाचा उपयोग करून बायोफर्टिलायझर विकसित केले. थ्रिपसिल, लार्व्हिनील, मिलिगार्ड ही ऑरगॅनिक खते, जंतुनाशके तयार केली आहेत. थ्रिपसिल हे ढोबळी मिरचीपासून, लार्व्हिनील हे लवंग, तर मिलिगार्ड हे ढोबळी मिरची व निलगिरीपासून तयार केले. याच्या फवारणीतून पिकांना, शेतकऱ्यांना आणि जनावरांना कोणताही साइडइफेक्‍ट होत नाही. कोणतेही दुष्परिणाम न होता जास्तीत जास्त उत्पादन घेता येईल, हा त्याचा प्रयत्न आहे. या वर्षी दसऱ्यापासून त्याने ‘अक्षय बायो सिरेल्स ॲन्ड पल्सेस’ ही नवी कंपनी स्थापन केली. त्यात ज्वारी, नाचणी, गहू (खपली) सेंद्रिय उत्पादनांची विक्री सुरू केली. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news organic pesticides agriculture