नवदृष्टी देत ३० रुग्णांची मकरसंक्रांत गोड

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 16 जानेवारी 2018

येवला - राजापूर व नगरसूल (ता. येवला) जिल्हा परिषद गटातील नेत्ररुग्णांची भाजपचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य बाबा डमाळे यांच्या पुढाकाराने मोफत तपासणी करत त्यांची पुणे येथे नेत्रशस्त्रक्रिया करण्यात आली. या रुग्णांना नवदृष्टी देत सोमवारी (ता. १५) येवला येथे आणले. नगराध्यक्ष बंडू क्षीरसागर यांच्या हस्ते मकरसंक्रांतीनिमित्त या रुग्णांना तीळगूळ व साईबाबा पुस्तिकाचे वाण देऊन बाबा डमाळे यांनी नावीन्यपूर्ण मकरसंक्रांत साजरी केली. 

श्री. डमाळे व पुणे येथील देसाई आय हॉस्पिटल यांच्यातर्फे राजापूर व नगरसूल जिल्हा परिषद गटातील सुमारे १३ हजार रुग्णांच्या मोफत तपासण्या झाल्या आहेत. त्यांपैकी सुमारे ४०० मोतीबिंदू शस्त्रक्रियांसाठी पात्र असणाऱ्या रुग्णांची निवड झाली. त्यांपैकी ३० रुग्णांवर शनिवारी (ता. १३) पुणे येथे देसाई आय हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया झाल्या. 

उर्वरित रुग्णांवर १५ व २१ अशा पुढील टप्प्यातील तारखांना पुणे येथे नेऊन मोफत शस्त्रक्रिया होणार आहेत. पुणे येथे शस्त्रक्रिया करून येवल्यात आणलेल्या रुग्णांना बाबा डमाळे, नगराध्यक्ष क्षीरसागर, नगरसेवक प्रमोद सस्कर, नगरसेवक गणेश शिंदे, धनंजय कुलकर्णी, तालुकाध्यक्ष राजू परदेशी, मनोज दिवटे, पहिलवान सुभाष पाटोळे, तरंग गुजराथी, नाना लहरे, सुनील घुगे, राजू नागपुरे, योगेश नाजगड, अशोक शिंदे, प्रमोद घाटकर आदींसह भाजप पदाधिकाऱ्यांच्या हस्ते तीळगूळ देण्यात आला.

दरम्यान, मकरसंक्रांतीनिमित्त सावरगाव व देवरगाव येथील रुग्णांची सकाळी सावरगाव येथील डॉ. काटे रुग्णालयात बाबा डमाळे, मच्छिंद्र पवार, नंदू गव्हाणे, दीपक राजवाडे, ॲड. योगेश नाजगड यांच्या उपस्थितीत सुमारे सातशे रुग्णांच्या तपासण्या झाल्या. यापूर्वी अंदरसूल गटातील १५ हजार लोकांच्या मोफत तपासण्या व ६५० रुग्णांच्या मोफत नेत्र शस्त्रक्रिया झाल्या आहेत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: nashik news positive news makar sankrant eye New vision