#FridayMotivation : त्या तिघांनी केली रस्त्याची दुरुस्ती

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 19 जुलै 2019

खड्डे पडलेल्या रस्त्यावरून जाताना नागरिक प्रशासनाच्या नावाने बोटे मोडतात. प्रशासनाला जागे करण्यासाठी निवेदन देतात. फार फार तर लोकशाही मार्गाने आंदोलन किंवा रस्त्यात वृक्षारोपण करून प्रशासनाला धारेवर धरतात. पण, आंदर मावळातील तीन तरुणांनी ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे स्वखर्चातून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे.

टाकवे बुद्रुक (पुणे) : खड्डे पडलेल्या रस्त्यावरून जाताना नागरिक प्रशासनाच्या नावाने बोटे मोडतात. प्रशासनाला जागे करण्यासाठी निवेदन देतात. फार फार तर लोकशाही मार्गाने आंदोलन किंवा रस्त्यात वृक्षारोपण करून प्रशासनाला धारेवर धरतात. पण, आंदर मावळातील तीन तरुणांनी ‘आधी केले मग सांगितले’ या उक्तीप्रमाणे स्वखर्चातून रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचे काम हाती घेतले आहे. 

आंदर मावळात रस्त्यांची दुरवस्था नेहमीचीच आहे. त्यामुळे या तरुणांनी वाहनचालकांनी खड्ड्यातून वाट होणारी कसरत पाहिली. खड्डे चुकवतच कामाला जाणाऱ्या कामगारांची, दवाखाना जाणाऱ्या रुग्णांची तसेच आठवडे 
बाजारासाठी जाणाऱ्या नागरिकांची व्यथा जाणून घेतली. त्यानंतर त्यांनी थेट रस्त्याच्या दुरुस्तीचे काम हाती घेतले. 

सतीश थरकुडे, अविनाश हांडे आणि संदेश मेहेर असे या तरुणांचे नाव. आंबी मंगरूळ, खराळाचा ओढा, आंबळे, निगडे ते कल्हाट भोयरेपर्यंतचा संपूर्ण रस्ता जागोजागी उखडला आहे. मात्र, त्याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत आहे.
गेल्या काही दिवसांत या रस्त्यावरील अपघाताचे प्रमाण वाढले आहे. त्यातून या तिघांनी स्वखर्चातून निगडे-आंबळे रस्त्यावर मुरूम टाकत खड्डे बुजविण्याचा प्रयत्न केला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nigade Ambave Road Hole Reapairing Motivation Initiative