कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी खंडाळ्याला मिळाला 'श्वास'!

अशपाक पटेल
Tuesday, 13 October 2020

कोरोनाविरुद्धच्या लढाईला बळ देण्यासाठी खंडाळा तालुक्‍यातील गरजू कोरोनाग्रस्तांना लागणाऱ्या ऑक्‍सिजनची निकड पाहून किसन वीर समूहाचे अध्यक्ष मदन भोसले व त्यांच्या कुटुंबीयांनी विनामोबदला नऊ ऑक्‍सिजन किट खंडाळा नगरपंचायतीचे नगरसेवक अनिरुद्ध गाढवे यांच्याकडे सुपूर्द केली.

खंडाळा (जि. सातारा) : कोरोनाबाधित रुग्णांची अपुऱ्या सुविधांमुळे परवड सुरू आहे. डॉक्‍टर व आरोग्य सेवक आपापल्यापरीने प्रत्येक रुग्णाची काळजी घेत त्यांच्यावर योग्य ते उपचार करत आहेत. त्यांच्या कोरोनाविरुद्धच्या लढाईला बळ देण्यासाठी खंडाळा तालुक्‍यातील गरजू कोरोनाग्रस्तांना लागणाऱ्या ऑक्‍सिजनची निकड पाहून किसन वीर समूहाचे अध्यक्ष मदन भोसले व त्यांच्या कुटुंबीयांनी विनामोबदला नऊ ऑक्‍सिजन किट खंडाळा नगरपंचायतीचे नगरसेवक अनिरुद्ध गाढवे यांच्याकडे सुपूर्द केली. 

खंडाळा साखर कारखान्याचे अध्यक्ष, ज्येष्ठ नेते शंकरराव गाढवे यांच्या उपस्थितीत ही किट श्री. भोसले यांनी नगरसेवक गाढवे यांच्याकडे सुपूर्द केली. या वेळी उद्योजक सुदीप भट्टड यांनी या ऑक्‍सिजन किट वापरासंदर्भातील माहिती उपस्थितांना दिली. कार्यक्रमास किसन वीर कारखान्याचे संचालक मधुकर शिंदे, खंडाळा नगरपंचायतीचे नगराध्यक्ष प्रल्हाद खंडागळे, उपनगराध्यक्षा शोभा गाढवे, नगरसेवक दत्तात्रय गाढवे, युवराज गाढवे, साजिद मुल्ला, तात्या नरूटे, उद्योजक मोहन सारडा, संतोष जाधव, योगेश जाधव, डी. जी. गाढवे, प्रा. वसंत पंडित, सुनील संकपाळ, कल्पना गाढवे, दशरथ गाढवे, संतोष भोसले, विजय वाघ, श्रीकांत घाटे आदी उपस्थित होते. 

सकारात्मक ऊर्जा, आईच्या आठवणीतून कोरोनावर सहज मात : डाॅ. प्रकाश कदम 

कोरोनाच्या सुरुवातीपासून मदन भोसले व कुटुंबीयांनी आजपर्यंत सामाजिक बांधिलकी जपत व सहकार्याच्या भावनेतून प्रशासन, पोलिस दल, आशा स्वयंसेविका, आरोग्य सेवक यांना हॅण्ड सॅनिटायझर, मास्क, हॅण्डग्लोज, ऑक्‍सिमीटर, गुडुची टॅबलेट वाटप मोठ्या प्रमाणावर उपलब्ध करून दिले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Nine Oxygen Kits For Khandala Were Donated By Madan Bhosales Family Satara News