अंधांकडून कळसूबाई शिखर सर

Sunil-Fadtare
Sunil-Fadtare

ओगलेवाडी - निरोगी व सदृढ आरोग्यासाठी ‘तम्ही निसर्गाशी मैत्री करा, प्रेम करा, निसर्ग आपल्याला भरभरून मदत करतो,’ हा संदेश येथील हुतात्मा अपंग बहुउद्देशीय विकास कल्याणकारी संस्थेने आपल्या कृतीतून नुकताच सिद्ध केला आहे. ट्रेकिंगचे तंत्रशुद्ध प्रशिक्षण देणाऱ्या संस्थेची त्यांनी स्थापना केलेली असून, त्यात ५० अंध, अपंग, मूकबधिर सदस्यांनी ट्रेकिंगचे शिक्षण घेऊन कळसूबाईचे उंच, अवघड शिखरही सर केले आहे. 

स्वतः अंध, पदवीधर असलेले ‘हुतात्मा’चे संस्थापक अध्यक्ष सुनील फडतरे यांनी कष्ट, जिद्द व चिकाटीने येथे १६ वर्षांपूर्वी क्रांतीअग्रणी नागनाथआण्णा नायकवडी यांची प्रेरणा आणि ज्येष्ठ नेते माजी आमदार पी. डी. पाटील यांचे विशेष सहकार्य आणि मार्गदर्शनामधून हुतात्मा अपंग संस्थेची स्थापन केली. ‘एकमेका देऊ आधार, आपणच करू आपला उद्धार’ हे ब्रीद घेऊन संस्थेच्या रोपट्याखाली आज भुकेल्यांची तहान भागवली जात असून, आपल्या गर्द छायेत अनेक अपंग, अंधाचे संसार उभे राहिले आहेत.

राज्यातील १२ जिल्ह्यांत संस्थेचे ३०० अपंग सक्रिय सभासद आहेत. संस्थेने वधू- वर सूचक केंद्राच्या माध्यमातून अपंगांचे विवाह केले आहेत. रक्तदान, नेत्रचिकित्सा शिबिराचे आयोजन करून विधायक कार्याची पणती सदैव तेवत ठेवली आहे. १०० ते १५० अपंगांना मोफत सायकल, व्हील चेअर्स, कुबडी, चष्मे, श्रवण यंत्रे, ब्लॅंकेट आदी साहित्याचे वाटप केले आहे. अपंगात आत्मविश्वास व धाडस निर्माण होण्यास साहसी स्पर्धा, अपंग मेळावे, अंधदिन, अपंग दिनासारखे राष्ट्रीय दिन साजरे करून राष्ट्रीय एकात्मता व सामाजिक बांधिलकी जोपासलेली आहे. अंधांचा ऑर्केस्ट्रा, त्यांच्या राज्यस्तरीय क्रिकेट स्पर्धा घेतल्या आहेत. संस्थेच्या वतीने अपंग, गरजू, अनाथ, वृद्धांसाठी वृद्धाश्रमही स्थापन केला आहे. अपंग सभासदांच्या मदतीसाठी अँब्युलन्स खरेदी करण्याचा प्रयत्न सुरू आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com