दुर्मिळ जातीच्या घुबडाला मिळाले जीवदान

संदीप जगदाळे
रविवार, 23 एप्रिल 2017

किंमत लाखो रुपये

हे घुबड श्रुंगी जातीचे असून ही जात दुर्मीळ होत चालली आहे. या घुबडाचा वापर काळा जादूटोणामध्ये वापरतात. त्याची बाजारात किंमत लाखो रुपयांची आहे.

हडपसर : वडकी येथे उन्हामुळे अशक्तपणा आलेल्या श्रुंगी दुर्मिळ जातीच्या घुबडाला सामाजिक कार्यकर्ते अनिकेत राठी व शेलार मामा यांनी पक्षमित्रांच्या ताब्यात दिले. त्यामुळे घुबडाला जीवदान मिळाले. 

राठी म्हणाले, "उन्हामुळे व्याकुळ झालेल्या घुबडाला उडता येत नव्हते. ते कासाविस झाले होते. अखेर दिवसभर पक्षमित्रांशी संपर्क साधल्यानंतर संदेश भाडळे यांनी घुबडला ताब्यात घेतले. दरम्यान शेलार यांनी या घुबडाचा पोडच्या पोराप्रमाणे सांभाळ केला. त्याला खायला-प्यायला घातले."

भाडळे यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे घुबड श्रुंगी जातीचे असून ही जात दुर्मीळ होत चालली आहे. या घुबडाचा वापर काळा जादूटोणामध्ये वापरतात. त्याची बाजारात किंमत लाखो रुपयांची आहे. त्याच्यावर उपचार केल्यानंतर पुन्हा त्याला पून्हा आकाशात भरारी घेण्यासाठी मुक्त केले जाईल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: owl of rare species saved in pune