भूस्खलनग्रस्तांच्या दु:खावर मायेची फुंकर

गोकुळचे मुंबईस्थित रहिवाशी, मराठवाड्यातील टायगर ग्रुपची मदत
Koyna Division
Koyna Divisionesakal

कोयनानगर (सातारा) : कोयना विभागावर (Koyna Division) आपत्तीचा डोंगर कोसळला आहे. या डोंगरा एवढ्या संकटामुळे विभागातील मिरगाव, बाजे, गोकुळनाला (Patan Taluka Landslide) या गावांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला. या गावांवर कोसळलेल्या संकटातून ग्रामस्थांना बाहेर पडण्यासाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरूच आहे. राज्यातील अनेक सामाजिक संस्थांनी मदत देवून मायेची फुंकर घातली आहे. यात कोयना विभागातील मुंबई स्थित गोकुळ येथील रहिवाशांनी सर्व बाधित कुटुंबाना जीवनावश्यक व संसारपयोगी वस्तु तर मराठवाडा येथील टायगर ग्रूपच्यावतीने अन्नछत्र सुरु केले आहे.

Summary

मुसळधार पावसाने कोयना विभागातील मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी, बाजे, गोकुळनाला या गावांवर झालेल्या भूस्खलनाने मोठी दुर्घटना घडलीय.

मुसळधार पावसाने कोयना विभागातील मिरगाव, ढोकावळे, हुंबरळी, बाजे, गोकुळनाला या गावांवर झालेल्या भूस्खलनाने मोठी दुर्घटना घडली. या गावाच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. कोयनानगर येथे या गावांतील ग्रामस्थांना सुरक्षित स्थळी हलवले आहे. या दुःखातून बाहेर येवून ती ताठ मानेने उभी रहावित यासाठी राज्यातील व कोयना विभागातील जनतेने कंबर कसली आहे. मदत नव्हे तर कर्तव्य या जाणिवेतून कोयना विभागातील मुंबई स्थित रहिवाशांनी या चार गावातील जनतेला जीवनावश्यक व संसारपयोगी गॅस, सिलेंडर, धान्य, कपडे, शेगडी आदी गोष्टी दिल्या आहेत.

Koyna Division
कोंडोशीकरांसाठी शिक्षक ठरले 'देवदूत'; अंगावर शहारे आणणारी कहाणी

गोकुळ गावचे मुंबई स्थित रहिवाशी पांडुरंग कदम, अशोक सावंत, अंकुश सावंत, अशोक करपे, दिलीप चव्हाण, रमेश पवार, उत्तम सूर्यवंशी, संजय लाड, डी. डी. कदम यांनी हे वाटप केले. मराठवाडा येथील टायगर ग्रूपने कोयना विभागात ठिय्याच मांडून दरडग्रस्त लोकांसाठी त्यांनी दररोज दोनवेळा अन्नछत्र ,चहा, नाष्टा देण्याचे काम सुरु केले आहे. कोयना विभागातील अनेक आपदग्रस्त गावात जीवनावश्यक वस्तूचे वाटप या ग्रूप च्या माध्यमातुन होत आहे. ग्रूपचे अध्यक्ष उमेश पोखरकर व सदस्य यांच्या माध्यमातून बाधिताचे अश्रू पुसण्याचे काम होत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com