कोंडोशीकरांसाठी शिक्षक ठरले 'देवदूत'; अंगावर शहारे आणणारी कहाणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Teacher

अतिवृष्टीत सापडलेल्या गावातील ग्रामस्थांना मदतीचा हात देताना एका शिक्षकाने (Teacher) तब्बल ३०० किलोमीटरचा प्रवास केला.

कोंडोशीकरांसाठी शिक्षक ठरले 'देवदूत'; अंगावर शहारे आणणारी कहाणी

नागठाणे (सातारा) : अतिवृष्टीत (Heavy Rain) सापडलेल्या गावातील ग्रामस्थांना मदतीचा हात देताना एका शिक्षकाने (Teacher) तब्बल ३०० किलोमीटरचा प्रवास केला. हे करताना तीन जिल्ह्यांतील डोंगरदऱ्या, नद्या, घाट पार करत त्याने सुमारे ३५ हजार रुपयांची मदत गावातील कुटुंबीयांपर्यंत पोचविली. अंगावर शहारे आणणारी एका शिक्षकाची ही कहाणी. जयवंत व्यंकटराव जाधव हे या शिक्षकाचे नाव. ते सातारा तालुक्यातील निगडी (वंदन) या गावचे रहिवासी आहेत.

सध्या ते महाबळेश्वर तालुक्यातील कोंडोशी येथील शाळेत कार्यरत आहेत. कोंडोशी हे सातारा, रायगड अन् रत्नागिरी जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले गाव. अत्यंत दुर्गम गावांत कोंडोशीचा समावेश होतो. हे गाव जरी सातारा जिल्ह्यात असले तरी संपर्कासाठी कोकणाला नजीक आहे. नुकत्याच झालेल्या प्रलंयकारी अतिवृष्टीचा तडाखा या गावाला बसला. शेतजमीन वाहून गेली. जनावरे दगावली. त्यात गावाचा साताऱ्याशी असलेला संपर्क पूर्ण तुटल्यामुळे आणखीच समस्या वाढल्या. महाबळेश्वरकडून येणारे रस्तेही बंद होते. मग ग्रामस्थांनी पोलादपुरात येऊन श्री. जाधव यांना परिस्थितीची माहिती दिली.

हेही वाचा: 'प्रवीणच्या कुटुंबीयांना सातारा सोडण्याची वेळ येवू देणार नाही'

त्यानंतर श्री. जाधव यांनी आपल्या मित्रांकडून मोठ्या प्रमाणात मदत गोळा केली. ही मदत चारचाकी वाहनातून घेऊन ते सातारा, पुणे तिथून ताम्हिणी घाटातून कोकणात माणगावला पोचले. माणगाव, महाड, पोलादपूर या मार्गाने कुडपण या गावी पोचण्यात त्यांना यश आले. तिथे कोंडोशी गावातील ग्रामस्थ पायी पोचले होते. या गावातील ३५ कुटुंबांना जीवनावश्यक साहित्य वितरित करण्यात आले. या कामी उमेश कणसे, सुभाष पाटील, रवींद्र चिकणे, योगेश मांडवे, ओंकार आंबले, विलास भिलारे, अशोक राऊत, दिलीप जाधव, आनंद पळसे तसेच अंगापुरातील ग्रामस्थांची मदत लाभली.

हेही वाचा: जबरा फॅन! देवेंद्र फडणवीसांचं नाव हृदयावरच गोंदवणार होतो; पण..

ग्रामस्थांना अश्रू अनावर

एका शिक्षकाने स्वतःचा जीव धोक्यात घालून आपल्यासाठी आणलेली मदत पाहून ग्रामस्थांना अश्रू अनावर झाले. ही धावाधाव करताना श्री. जाधव हे दिवसभर उपाशी होते. महाडचे आमदार भरतशेठ गोगावले यांनाही या घटनेची माहिती मिळाली. त्यांनीही श्री. जाधव यांचे कौतुक केले.

Web Title: Teacher Jaywant Jadhav Help Of 35 Thousand To The Citizens Of Satara Raigad Ratnagiri

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top