माणुसकीचं दर्शन! दरड कोसळलेल्या आंबेघरला 'जमियत'चा आधार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Hakimuddin Qasmi

मोरणा भागात एकमेव पेठशिवापूरमध्ये मुस्लिम समाज आहे; परंतु या ठिकाणी कधीही जातीयवाद नाही.

माणुसकीचं दर्शन! दरड कोसळलेल्या आंबेघरला 'जमियत'चा आधार

मोरगिरी (सातारा) : आंबेघर (ता. पाटण) येथे दरड कोसळून (Patan Taluka Landslide) मृत्यू झालेल्या नऊ कुटुंबांतील सर्वांना पक्की घरे बांधून देऊ. त्यांची सर्व जबाबदारी आमच्या सातारा, पाटण व पेठशिवापूरचे सदस्यांवर असेल, असे मत जमियत उलेमा-ए-हिंदचे (Jamiat Ulema-e-Hind) सचिव मौलाना हकिमुद्दीन कासमी (Maulana Hakimuddin Qasmi) यांनी व्यक्त केले. मोरणा विभागातील आंबेघर येथे पाहणी करण्यासाठी आले होते. त्या वेळी ते बोलत होते.

जमियत उलेमा-ए-हिंदचे मौलाना जमिर, कऱ्हाडचे हाफीज आमिन, पाटणचे हाफीज अल्ताफ, पेठशिवापूरचे अब्दुल करीम, माजी जिल्हा परिषद सदस्य बशीर खोंदू, मोरगिरी मुस्लिम समाज प्रमुख व ग्रामपंचायत सदस्य महंमद इसाक खोंदू, सरपंच सुबिया मुकादम, विवेक मोहोळकर, संदीप कोळेकर, पूरग्रस्त व हिंदू-मुस्लिम कार्यकर्ते उपस्थित होते.

हेही वाचा: भूस्खलनग्रस्तांच्या दु:खावर मायेची फुंकर

बशीर खोंदू म्हणाले, ‘‘मोरणा भागात एकमेव पेठशिवापूरमध्ये मुस्लिम समाज आहे; परंतु या ठिकाणी कधीही जातीयवाद नाही. सर्व जण एकमेकांच्या खांद्याला खांदा लावून राहतात. सर्वांच्या सुख दु:खात आम्ही सहभागी आहोत.’’ दरम्यान, पाटण तालुक्यातील आंबेघर, मिरगाव, ढेकावळे, घोटसह सहा गावांत दुर्घटनाग्रस्त भागातील ४० कुटुंबांना संसारोपयोगी साहित्याच्या मदतीचाही ओघ सुरुच आहे.

Web Title: Patan Taluka Landslide Testimony Of Maulana Hakimuddin Qasmi To Build Houses For Nine Families In Ambeghar

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top