पोलिसांच्या सतर्कतेमुळे युवकाचे वाचले प्राण

सकाळ वृत्तसेवा
Monday, 16 December 2019

मी माझ्या आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या करीत आहे, अशी माहिती नियंत्रण कक्षाला मिळते. वेळीच पौड पोलिस घटनास्थळी दाखल होतात आणि या युवकाचे प्राण वाचवितात.

कोळवण - मी प्रवीण पवार, रा. स्क्वेअर मेमरीज इमारत, माताळवाडी फाटा, भूगाव, ता. मुळशी. मी माझ्या आर्थिक अडचणींमुळे आत्महत्या करीत आहे, अशी माहिती नियंत्रण कक्षाला मिळते. वेळीच पौड पोलिस घटनास्थळी दाखल होतात आणि या युवकाचे प्राण वाचवितात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्रवीण पवार याने आत्महत्या करीत असल्याची माहिती नियंत्रण कक्षाला दिली. त्यानुसार, नियंत्रण कक्षाने तत्काळ पौड पोलिसांना ही माहिती दिली. ठाणे अंमलदार कांबळे यांनी माहिती मिळताच बिट अंमलदार एस. राक्षे यांना कळविले. एस. राक्षे व होमगार्ड भरत शेडगे हे याठिकाणी आले. येथे चौकशी केली असता प्रवीण पवार नावाची व्यक्ती येथे राहत नसल्याचे लोकांनी सांगितले. 

पोलिसांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता समोरच सोफ्यावर पवारने आपल्या डाव्या हाताची मनगटाची नस कापलेली दिसली. पोलिसांनी हातावर रुमाल बांधून त्याला तत्काळ जमलेल्या लोकांचे मदतीने समोरच  असलेल्या युनिक हॉस्पिटलमध्ये दाखल केले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Police Alertness young man's life saved