बेपत्ता पित्याची तपानंतर भेट

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 6 ऑगस्ट 2018

येरवडा - मुंबई येथील प्रकाश देशपांडे बारा वर्षांपूर्वी हरविले होते. नातेवाइकांनी त्यांची आशा सोडली होती. दरम्यान, सोलापूर येथील एका स्वयंसेवी संस्थेने त्यांना मनोरुग्ण म्हणून न्यायालयाच्या परवानगीने येरवडा मनोरुग्णालयात दाखल केले. रुग्णालय प्रशासन व मुंबई पोलिसांच्या प्रयत्नांमुळे देशपांडे हे तब्बल बारा वर्षांनंतर आपल्या घरी परतले आहे. त्यांना घेण्यासाठी त्यांची मुलगी आली होती. बापलेकीची ही भेट पाहून रुग्णालयातील कर्मचाऱ्यांही अश्रू आवरता आले नाही.

सोलापूर येथील एका स्वयंसेवी संस्थेने पाच महिन्यांपूर्वी प्रकाश गजानन देशपांडे (वय ५४) यांना न्यायालयाच्या परवानगीने मनोरुग्ण म्हणून येरवडा येथील रुग्णालयात दाखल केले होते. रुग्णालयाचे अधीक्षक डॉ. अभिजित फडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली मनोविकारतज्ज्ञ डॉ. मनोहर पवार व समाजसेवक अधीक्षक ब्रह्मदेव जाधव यांनी देशपांडे यांच्यावर उपचार सुरू केले. वैद्यकीय उपचार व समुपदेशनामुळे ते बरे होऊ होते. त्या वेळी जाधव रुग्णांशी चर्चा करून नाव, पत्ता शोधत होते. त्या वेळी देशपांडे यांनी मुंबईतील पत्त्याबाबत जुजबी माहिती दिली. त्यावरून जाधव यांनी मुंबई पोलिसांशी संपर्क साधून दादर येथील देशपांडे यांच्या नातेवाइकांना त्यांच्याबदल माहिती दिली. 

दादर पोलिस ठाण्यातील उपनिरीक्षक एस. भाबड यांनी त्यांच्या नातेवाइकांना अखेर शोधून काढले. देशपांडे यांची पत्नी व मुलीस याबाबत माहिती मिळताच त्यांनी कागदपत्रांसह समाजसेवा अधीक्षकांशी संपर्क साधला. त्यानंतर ते मनोरुग्णालयात आले व मुलीने तत्काळ आपल्या वडिलांना ओळखले.

अनपेक्षित झाली भेट
बारा वर्षांपूर्वी हरविलेल्या प्रकाश देशपांडे यांचा नातेवाइकांनी सगळीकडे शोध घेतला होता. मात्र ते सापडले नव्हते. त्याबाबत त्यांनी पोलिस ठाण्यात ते हरविल्याची नोंद केली होती. परंतु, त्यांचा शोध न लागल्याने नातेवाइकांनी ते परत येण्याची आशा सोडून दिली होती. मात्र त्यांची आता परत नातेवाइकांशी भेट झाली. यामुळे त्यांच्या कुटुंबांचा आनंद ओसंडून वाहत होता.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police prakash deshpande yerawada hospital humanity