पोलिस झाले त्यांच्यासाठी देवदूत 

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 2 सप्टेंबर 2018

नागपूर - गतिमंद मुलगी काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली. मानकापूरचे पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांनी मुलीचा शोध घेऊन आई-वडिलांना सोपवले. आईने मोठ्याने हंबरडा फोडत "पोलिस दादा आमच्यासाठी देवदूत आहेत' अशी प्रतिक्रिया देऊन आभार मानले. या प्रकारामुळे खाकी वर्दीतील कठोर मनाच्या व्यक्‍तिरेखेच्या डोळ्याच्या कळा पाणावल्या होत्या. 

पोलिस ठाण्याच्या हद्दीत झेंडा चौकातील झिंगाबाई टाकळी फळविक्रेता रमाशंकर शाहू व पत्नी आशादेवी यांची गतिमंद सात वर्षांची मुलगी काही दिवसांपूर्वी बेपत्ता झाली. तिचा शोध मानकापूर पोलिस घेत होते. मुख्याध्यापिका गायत्री तिवारी यांनी मानकापूरचे पोलिस निरीक्षक महेश चव्हाण यांना मुलगी रस्त्याने फिरत असल्याची माहिती दिली. ते लगेच स्टाफसह तिचा शोध घेण्यास निघाले. दोन तास शोध घेतल्यानंतर मुलगी पोलिसांना मिळाली. तिला ताब्यात घेऊन नाश्‍ता व पाणी दिले. त्यानंतर तिच्या गणवेशावरून गतिमंद केंद्राच्या संचालकाला फोन लावला. तिच्या आईवडिलाला पोलिस ठाण्यात बोलावले. त्यांनी ही मुलगी आपली असल्याचे सांगून तिचे नाव ज्योती असल्याचे सांगितले. आई-वडिलांचे आधार कार्ड आणि मुलीचे आधार कार्ड बघून पोलिसांनी ओळख पटवून घेतली. त्यानंतर गतिमंद मुलीला पालकांच्या स्वाधीन केले. बेपत्ता मुलगी मिळताच आई-वडिलांच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: police saves lifes