शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरसावले शेकडो हात 

संजय खांडेकर
रविवार, 13 मे 2018

धामणा (लिंगा) - वीज दुरुस्तीसाठी महावितरणचे कर्मचारी हातात स्कू ड्रायव्हर, हातमोजे व अन्य विजेचे साहित्य घेऊन येताना अनेकांनी पाहिले असतील. मात्र, खंडाळ्यातील शेतकऱ्यांना वीज कर्मचाऱ्यांच्या हातात कुदळी, फावडे पाहून आश्‍चर्याचा धक्काच बसला. शेतकऱ्यांना पाण्याची सोय व्हावी यासाठी यासाठी नागपूर तालुक्‍यातील खंडाळा पारडी येथील महावितरणच्या सातशे कर्मचाऱ्यांनी श्रमदान करून तलावाचे खोलीकरण केले. त्यांनी या श्रमदानातून शेतकऱ्यांप्रति कृतज्ञता व्यक्त केली.

खंडाळा (पारडी) हे दुर्गम व दुर्लक्षित गाव. गावानजीकच जुना तलाव आहे. सतत दुर्लक्ष होत असल्याने त्यात गाळ साचलेला होता. महावितरण कर्मचाऱ्यांच्या ‘स्नेहभोजनातून श्रमदान’ उपक्रमातून गावातील बुजलेल्या तलावाचे खोलकरण करण्याचा संकल्प केला. यासाठी खंडाळा (पारडी) ग्रामपंचायतचे सरपंच विनोद भांगे, महावितरणचे प्रादेशिक संचालक भालचंद्र खंडाईत, मुख्य अभियंता रफिक शेख, वैभव थोरात, नारायण आमझरे, मधुसूदन मराठे यांनी जिल्हाधिकारी अश्विन मुद्‌गल यांच्या सहकार्याने या कल्पनेला मूर्त रूप दिले.शनिवार १२ मे ला सकाळी सहाला जिल्हाधिकारी व महावितरणचे प्रादेशिक संचालक यांच्या हस्ते या शुभकार्याला सुरवात झाली. यावेळी उपविभागीय अधिकारी सूरज वाघमारे, कुंदान भिसे, सुहास देशपांडे, डॉ. सोनाली बाके, डॉ. शुभम सिंग, राहुल लांजेवार, मुकेश भोयर, विष्णू गणविर, रणी भुसारी, वैशाली डुले, कांचन भांगे, विद्या भुसारी यांनी महावितरणाच्या ७०० अधिकारी कर्मचाऱ्यांसह श्रमदान केले.

जलसंवर्धनाचे प्रतीक दिले भेट
अभियानाचा संपूर्ण खर्च महावितरणच्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी स्वतःच्या वेतनातून उचलला. यावेळी मान्यवरांना ग्रा.पं. व जिल्हा परिषदेच्या वतीने तुळशीचे रोपटे व जलसंवर्धनाचे प्रतीक म्हणून ओंजळीच्या आकाराचे भांडे प्रदान करण्यात आले. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्येकडे लक्ष देत राबविलेल्या या अभियानाचे कौतुक करण्यात येत आहे.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: positive story Hundreds of hands have come to help farmers