सिक्‍युरिटीची नोकरी करत बनला फौजदार

धनाजी पाटील
मंगळवार, 3 जुलै 2018

पुनाळ - वडिलोपार्जित शेती म्हणावी, तर गुंठाभरही नाही. राहतं घरच काय ते आपलं. शिक्षणाचा मागमूस नसलेल्या घरात फौजदार झालेला मुलगा पाहून आईबापाचा ऊर भरून आला. काटेभोगाव (ता. पन्हाळा) येथील वाळवेकरवाडीतील सचिन दगडू भिलारी पहिल्याच प्रयत्नात फौजदार झाला. जेमतेम हजार लोकसंख्येच्या वाडीत दगडू भिलारी व राजूबाई भिलारी भूमिहीन शेतमजूर. रोज दोघांनी दुसऱ्याच्या शेतावर राबायचे हा त्यांचा नित्यक्रम. मुलगा शिकतोय एवढंच या आई-वडिलांना माहीत. परिस्थितीला बदलायचे हा चंग मात्र सचिनने मनाशी बांधला. परिस्थिती बदलायची, तर स्पर्धा परीक्षेकडे वळायला हवं, याचा विचार करून शिकवणीशिवाय स्वतः अभ्यास करू लागला.

पुनाळ - वडिलोपार्जित शेती म्हणावी, तर गुंठाभरही नाही. राहतं घरच काय ते आपलं. शिक्षणाचा मागमूस नसलेल्या घरात फौजदार झालेला मुलगा पाहून आईबापाचा ऊर भरून आला. काटेभोगाव (ता. पन्हाळा) येथील वाळवेकरवाडीतील सचिन दगडू भिलारी पहिल्याच प्रयत्नात फौजदार झाला. जेमतेम हजार लोकसंख्येच्या वाडीत दगडू भिलारी व राजूबाई भिलारी भूमिहीन शेतमजूर. रोज दोघांनी दुसऱ्याच्या शेतावर राबायचे हा त्यांचा नित्यक्रम. मुलगा शिकतोय एवढंच या आई-वडिलांना माहीत. परिस्थितीला बदलायचे हा चंग मात्र सचिनने मनाशी बांधला. परिस्थिती बदलायची, तर स्पर्धा परीक्षेकडे वळायला हवं, याचा विचार करून शिकवणीशिवाय स्वतः अभ्यास करू लागला. प्राथमिक शिक्षक वाळवेकरवाडी शाळेत, माध्यमिक शिक्षण राजर्षी शाहू हायस्कूल काटेभोगाव, तर बाजारभोगाव येथील आबासाहेब भोगावकर महाविद्यालयात बारावीपर्यंत शिकला. त्यानंतर पेटाळा येथे डीएड व मुक्त विद्यापीठातून पदवीधर झाला. पैसे मिळवले पाहिजेत व अभ्यासही केला पाहिजे, या ध्यासाने प्रेरित होऊन सचिनने सिक्‍युरिटी गार्ड म्हणून रात्री नोकरी व दिवसा अभ्यास हे तंत्र अवलंबले. ध्येयाने प्रेरित होऊन व परिस्थिती डोळ्यांसमोर ठेवून नेटाने अभ्यास केला. एमपीएससी परीक्षेचा निकाल लागला व तो पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झाला. मुलगा फौजदार झाल्याचे समजताच आईवडिलांनी अश्रुंना वाट मोकळी करून दिली. सचिनला स्पर्धा परीक्षेदरम्यान आई-वडील, प्रकाश कदम, शैलेश भोसले व मित्रपरिवार यांचे सहकार्य मिळाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: PSI Sachin Valvekar Success Motivation