ज्येष्ठांच्या पुढाकाराने सरला गावशिवारातला दुष्काळ 

गणेश कोरे
गुरुवार, 24 ऑगस्ट 2017

पुणे - जिल्ह्यातील बाेरी बुद्रुक हे कायम दुष्काळ सोसणारे गाव. यावर शाश्वत उपाय शोधण्यासाठी गावशिवारातील काेरडे मळ्यातील ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेतला. लाेकवर्गणी आणि स्वतःकडील पैसे खर्च करून शिवाराजवळील आेढ्याचे खाेली-रुंदीकरण केले. त्यातून शिवारातील जाधववाडी, डेरेमळा, माळवाडी परिसरांतील सुमारे ३०० एकर शेतीला फायदा झाला. उन्हाळ्यात सुमारे ३० विहिरी आणि ५० बाेअर्सना पाणी उपलब्ध झाले. त्यातून रब्बी व उन्हाळी हंगाम शाश्‍वत करण्यात गावाला यश आले आहे. 

पुणे - जिल्ह्यातील बाेरी बुद्रुक हे कायम दुष्काळ सोसणारे गाव. यावर शाश्वत उपाय शोधण्यासाठी गावशिवारातील काेरडे मळ्यातील ज्येष्ठ नागरिकांनी पुढाकार घेतला. लाेकवर्गणी आणि स्वतःकडील पैसे खर्च करून शिवाराजवळील आेढ्याचे खाेली-रुंदीकरण केले. त्यातून शिवारातील जाधववाडी, डेरेमळा, माळवाडी परिसरांतील सुमारे ३०० एकर शेतीला फायदा झाला. उन्हाळ्यात सुमारे ३० विहिरी आणि ५० बाेअर्सना पाणी उपलब्ध झाले. त्यातून रब्बी व उन्हाळी हंगाम शाश्‍वत करण्यात गावाला यश आले आहे. 

पुणे जिल्ह्यातील बाेरी बुद्रुक (ता. जुन्नर) हे गाव कायम दुष्काळाच्या झळा सोसायचे. गावच्या शिवाराशेजारून कुकडी नदी वाहते. मात्र विहिरी, बाेअरवेलचे पाणी कमी पडत असल्याने रब्बी धाेक्यात यायचे. पीक हातातून जायचे. सन २०१५ मध्ये तर दुष्काळाची तीव्रता फारच वाढली. 

यावर मात करण्यासाठी शिवारालगतच्या मृत आेढ्याचे पुनरुज्जीवन करून अोढा वाहता करण्यासाठी गावातील ज्येष्ठ ग्रामस्थांनी प्रयत्न केला. ग्रामस्थांना कामाचे स्वरूप समजावून देण्यात आले. त्यानंतर प्रस्तावाला पाठिंबा मिळत सुमारे ७० हजार रुपये लाेकवर्गणी गाेळा झाली. आेढा खाेलीकरणाचा शुभारंभ २०१५ च्या गुढीपाडव्याला गावातील ज्येष्ठांच्या हस्ते झाला. 

कामाची अंमलबजावणी 

गावातील जेसीबी यंत्र व्यावसायिक रमेश येवले आणि राजू डेरे यांनी केवळ डिझेलचा खर्च गावकऱ्यांनी करावा या बाेलीवर यंत्र उपलब्ध केले. स्थानिक आमदार शरद साेनवणे यांनी दाेन दिवस पाेकलँड यंत्र विनामूल्य उपलब्ध केले. १५ दिवसांच्या कामानंतर सुमारे २० फूट खाेल, ५०० फूट लांब तर २०० फूट रुंद एवढ्या आकाराच्या आेढ्याचे खाेली व रुंदीकरण करण्यात आले. हे काम गावातील ज्येष्ठांच्या निरीक्षणाखाली झाले. आेढ्याचे काम पूर्ण झाल्यानंतर कॅनाॅलला पाणी साेडले. त्याच्या पाझरामुळे पहिल्याच वर्षी आेढ्यात पाण्याचा चांगला साठा झाला. 

- अोढ्याच्या कामांचा फायदा शिवारातील जाधववाडी, डेरेमळा, माळवाडी परिसरांतील सुमारे ३०० एकर शेतीला झाला 
- उन्हाळ्यात सुमारे ३० विहिरी आणि ५० बाेअर्सना पाणी उपलब्ध 
- त्यातून रब्बी हंगाम शाश्‍वत 
- ‘सकाळ-ॲग्राेवन’च्या वतीने राबविण्यात येणाऱ्या ‘स्मार्ट व्हिलेज’अंतर्गत बाेरी बुद्रुक गावाची निवड 
- इस्राईलच्या धर्तीवर गावातील शेतीचा विकास करण्याची प्रक्रिया सुरू 

शिवाराजवळून जाणाऱ्या कॅनॉलमधून उन्हाळ्यात पाझरणाऱ्या पाण्याचा साठा करण्यासाठी आेढा खाेलीकरण आवश्‍यक हाेते. अनेक वर्षे गाळ काढला नसल्याने आेढा बुजून गेला हाेता. गावातील ज्येष्ठांनी एकत्र येऊन पुढाकार घेतला. लाेकवर्गणीतूनही कमी पडलेले पैसे आम्ही ज्येष्ठांनी वैयक्तिक स्वरूपात दिले. तरुणांचीही कामास चांगली साथ लाभली. 

सीताराम काेरडे - ८८५००४३३१६  (ज्येष्ठ नागरिक) 

अनेक वेळा दुष्काळाला सामोरे जाण्याची वेळ आली. अोढ्याच्या कामानंतर कोरडेमळा परिसरातील दाेन अडीच किलाेमीटर परिघातील विहिरी, बाेअरवेल्सना पाणी उपलब्ध झाले अाहे. उन्हाळ्यातील पाण्याची चिंताही कमी झाली आहे. 

पुष्पा काेरडे - ९०९६५१४७५९, सरपंच, बाेरी बुद्रुक. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news agriculture bori budruk Senior citizen