सेवा मित्रमंडळाकडून पूना नाईट स्कूलला मदत 

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 22 ऑगस्ट 2017

पुणे - दिवसा काम करून रात्रशाळांमधून शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मदत देण्याच्या "सकाळ माध्यम समूह' आयोजित गणेश मंडळांच्या बैठकीतील आवाहनास प्रतिसाद देत सेवा मित्रमंडळाने अकरा हजार रुपयांचा धनादेश आज सरस्वती मंदिर संस्थेच्या पूना नाईट हायस्कूलला सुपूर्द केला. धर्मादाय आयुक्तालयातर्फे आयोजित कार्यक्रमात राज्याचे धर्मादाय आयुक्त शिवकुमार डिगे यांच्या हस्ते रात्रशाळेचे मुख्याध्यापक अविनाश ताकवले यांनी तो स्वीकारला. 

"सकाळ'ने बोलाविलेल्या गणेश मंडळांच्या बैठकीत वर्गणीतील काही टक्के रक्कम रात्र प्रशालेतील गरजू विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी देण्याची सूचना केली होती आणि ती मंडळांनी मान्य केली होती. त्यानुसार "सेवा मित्रमंडळा'चे शिरीष मोहिते यांनी वर्गणीतील अकरा हजार रुपयांचा धनादेश सरस्वती मंदिर संस्थेच्या पूना नाईट हायस्कूलमधील 11 विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी दिला. 

"सकाळ'च्या या भूमिकेचे डिगे यांनीही कौतुक केले. डिगे म्हणाले, """सकाळ माध्यम समूहा'ने गणेश मंडळांना केलेले आवाहन कौतुकास्पद आहे. विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी मंडळांनी हातभार लावावा ही मोठी गोष्ट असून, "सकाळ'ने घेतलेल्या भूमिकेचे आम्ही स्वागत करतो.'' गणेश मंडळांनी आपल्या परिसरात असलेल्या रस्त्यांवरील खड्डे बुजवावेत, गरजू रुग्णांना मदत करावी, असे आवाहनही त्यांनी केले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: pune news seva mitra mandal poona night school