गुंड होणार होतो, न्यायाधीश झालो!

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 27 एप्रिल 2017

पुणे - ‘इयत्ता दहावीमध्ये नापास झालो, घरची परिस्थिती, वस्तीतील वातावरण यामुळे आता पुढे शिकायचे नाही. आता गुंडच व्हावे, असे मनात आले; परंतु आई खमकी होती. तिने मी केलेल्या पहिल्याच चुकीसाठी मला पोलिस चौकीत नेले. त्या वेळी पोलिसांनी पिळलेला कान अजून लक्षात आहे. त्यानंतर मागे वळून पाहिलेच नाही. कुटुंबीयांच्या पाठिंब्यामुळे वाईट संगत सोडून अभ्यासाची संगत धरली आणि आज स्पर्धा परीक्षेत यश मिळवून प्रथम वर्ग न्यायाधीश झालो,’’ ही कहाणी सांगत होते राहुल पोळ. 

रिक्षाचालक बलभीम पोळ यांचे ते पुत्र. रिक्षा पंचायतीच्या वर्धापनदिनी राहुल यांचा पंचायतीचे अध्यक्ष डॉ. बाबा आढाव यांच्या हस्ते सत्कार झाला. त्या वेळी राहुल बोलत होते. या वेळी पंचायतीचे निमंत्रक नितीन पवार, राहुल यांची आई जिजाबाई पोळ, वडील बलभीम पोळ, पत्नी ॲड. सांगिनी पोळ, रावसाहेब कदम उपस्थित होते. या वेळी आयोजित पानसुपारी समारंभास खासदार अनिल शिरोळे यांच्यासह शासकीय अधिकारी, लोकप्रतिनिधी, संघटना प्रतिनिधी आदी मान्यवरांनी भेट दिली.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rahul pol success story