हलाखीच्या परिस्थितीतही शिक्षण सुरू

सचिन बडे
शुक्रवार, 7 सप्टेंबर 2018

पुणे - हलाखीच्या परिस्थितीमुळं लहानपणीच छाया स्वामी यांचे शिक्षण थांबले... लग्नानंतर पोट भरण्यासाठी त्या चार घरांतील धुणी-भांडीची कामं करतात... सामाजिक आणि कौटुंबिक परिस्थितीच्या त्या बळी ठरल्या आणि छायाताईंना शिक्षणाचं महत्त्व जाणवलं... मग, औंधपासून लक्ष्मी रस्त्यापर्यंतचा दहा किलोमीटरचा सायकल प्रवास करीत वयाच्या ४२ वर्षी त्यांनी शाळेत पाऊल ठेवलं आणि आता ४७ व्या वर्षी दहावीच्या वर्गात शिक्षण घेत आहेत, खरं तर त्या एकही दिवस शाळेला दांडी मारत नाहीत, कारण, त्यांना आता पदवीपर्यंतच शिक्षण घ्यायचं आहे.

छायाताईंच्या वर्गात ३० ते ५० या वयोगटांतील २० विद्यार्थिंनी आहेत. छायाताईंसारखंच उदाहरण म्हणजे, अनिता अंकुशराव याचे. शिक्षण न झाल्याने अनिता यांना रोजच्या जगण्यात अडचणी येत होत्या. त्यातून त्यांच्या पदरी अहवेलनाही आली. मात्र, हे आव्हान मानून अनिता शाळेत आल्या. महिलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना शिक्षणाचा हक्क देणाऱ्या, श्रीमती रमाबाई
रानडे प्रौढ स्त्रियांच्या प्रशालेमधील वर्गात गेल्यानंतर छायाताई आणि अनिता यांची ओळख झाली. तेव्हा त्यांच्या अन्य वर्ग मैत्रिणीही भेटल्या. लक्ष्मी रस्त्यावरील या शाळेला यंदा ४६ वर्ष पूर्ण झाली. एवढ्या वर्षात सुमारे २ हजार विद्यार्थिनी अर्थात महिलांनी शिक्षणाचा लाभ घेतला आहे. 

अनिता म्हणाल्या, ‘‘अनेक वेळा माझी बस चुकायची. त्यामुळे मी शिकण्याचा निर्णय घेतला कोणालाही माहिती नव्हती.’

आमच्या शाळेमध्ये पहिली ते दहावीपर्यंतचे शिक्षण हे फक्त सहा वर्षांत पूर्ण केले जाते. रमाबाई रानडे स्त्री शिक्षण संस्थेमध्ये प्राथमिक गटात २५ स्त्रिया शिक्षण घेतात. तर माध्यमिकमध्ये १०० स्त्रिया शिक्षण घेत आहेत. 
- विद्या चव्हाण, मुख्याध्यापिका, रमाबाई रानडे प्रौढ स्त्रियांची प्रशाला

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ramabai Ranade Women School Education