
कऱ्हाड ः दिव्यांग व्यक्तींच्या रोजच्या जीवनातील अडथळे दूर करून त्यांना क्षमतांचा योग्य वापर करून प्रगतीच्या संधी उपलब्ध करून देणे गरजेचे आहे. त्यासाठी सामाजिक जाणीव बाळगून प्रत्येकाने कटिबद्ध राहायला हवे, असे आवाहन खासदार श्रीनिवास पाटील यांनी केले.
मलकापूरच्या रोटरी क्लबतर्फे खासदार पाटील यांच्या हस्ते जागतिक दिव्यांग दिना निमित्ताने तीन चाकी सायकली भेट देण्यात आल्या. खासदारांच्या गोटे येथील निवासस्थानी हा कार्यक्रम झाला. त्या वेळी ते बोलत होते. "रोटरी'चे अध्यक्ष सलीम मुजावर, उपाध्यक्ष प्रवीण जाधव, सदस्य भगवान मुळे, विलास पवार, विजय चव्हाण, अशोक पाटील, राहुल जामदार, फिरोज मुलाणी, सागर बर्गे, अतुल पाटील, राहुल पाटील, चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.
रिझर्व्ह बॅंकेच्या इशारा पत्रांनाही केराची टोपली; संचालकांचा अनागोंदी कारभार चव्हाट्यावर
खासदार पाटील म्हणाले, ""मी स्वतः दिव्यांग मित्र आहे. दिव्यांग लोकांसाठी बरेच काम केले आहे. दिव्यांगांना सायकल देऊन त्यांना पुन्हा समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून उभे करण्याचा प्रयत्न रोटरी क्लबमार्फत होत आहे. गरिबांना औषध वाटप वृक्ष लागवड, पुस्तक वाटप, विद्यार्थ्यांना फीमध्ये मदत असे अनेक उपक्रम "रोटरी'मार्फत राबविले जातात. सामाजिक जाणिवेतून राबविले जाणारे उपक्रम आणि "रोटरी'च्या पदाधिकारी व सदस्यांचे त्याबद्दलचे कार्य निश्चितच कौतुकास्पद आहे.'' सायकल वाटपामागील भूमिका "रोटरी'चे अध्यक्ष सलीम मुजावर यांनी मांडली. श्री. पाटील यांनी आभार मानले.
भक्कम आधार देणारे व्हा... (उदय टिकेकर)
Edited By : Siddharth Latkar
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.