राेटरीच्या दातृत्वाला सलाम...काेविड रुग्णांसाठी 11 ऑक्‍सिजन मशिन

भद्रेश भाटे
Thursday, 17 September 2020

या 11 मशिनबराेबर आणखी दोन गरजूंनाही मशिन देण्यात आल्या.

वाई (जि. सातारा) : ऑक्‍सिजन मशिन उपलब्ध करून वाई रोटरी क्‍लबने कोरोना रुग्णांना जीवनदान देण्यासाठी पुढाकार घेतला, ही अभिमानास्पद बाब आहे, असे गौरवोद्‌गार पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे यांनी काढले. येथील रोटरी क्‍लबतर्फे 11 ऑक्‍सिजन मशिनचा लोकार्पण सोहळा मॉडर्न हॉस्पिटलमध्ये पार पडला. 

या कार्यक्रमात पोलिस निरीक्षक श्री. खोबरे यांच्या हस्ते राजेश भोज यांच्या मातोश्रींना ऑक्‍सिजन मशिनची आवश्‍यकता असल्याने त्यांना हे मशिन सुपूर्त करण्यात आले. त्याचबरोबर आणखी दोन गरजूंनाही या मशिन देण्यात आल्या.

कराड पाेलिसांची दमदार कामगिरी; कसे पकडले 48 तासांत दराेडेखाेर सांगताहेत एसपी 

याप्रसंगी प्रा. डॉ. नितीन कदम, डॉ. शंतनू अभ्यंकर, नीला कुलकर्णी, क्‍लबचे अध्यक्ष अजित क्षीरसागर, सचिव डॉ. जितेंद्र पाठक, भाजपचे काशिनाथ शेलार, आय. एम. ए. चे माजी अध्यक्ष डॉ. अरुण पतंगे, प्रशांत शिंदे उपस्थित होते. राजेश भोज यांनी आभार मानले.

Edited By : Siddharth Latkar


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rotary Club Of Wai Donated Eleven Portable Oxygen Machine Satara News