मिरज तालुक्‍यातील संतोषवाडीच्या तरूणाला मिळाला आधार

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 जानेवारी 2019

ऐतवडे खुर्द - एकाच जागेवर कुणाशी काही न बोलता थांबला होता. लोक प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहत होते. तो कोणाला प्रतिसादही देत नव्हता. अखेर तो बोलता झाला. त्याने दिलेल्या माहितीनुसार संपर्क साधून संबंधितांना बोलावण्यात आले. त्याच्या नातेवाईकांना सांगून त्याचे सातारा येथील केंद्रात पुनर्वसन करण्यात आले आहे. माणुसकी जीवंत आहे, याचे प्रत्यंतर तरूणाईने दिले. 

ऐतवडे खुर्द - एकाच जागेवर कुणाशी काही न बोलता थांबला होता. लोक प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहत होते. तो कोणाला प्रतिसादही देत नव्हता. अखेर तो बोलता झाला. त्याने दिलेल्या माहितीनुसार संपर्क साधून संबंधितांना बोलावण्यात आले. त्याच्या नातेवाईकांना सांगून त्याचे सातारा येथील केंद्रात पुनर्वसन करण्यात आले आहे. माणुसकी जीवंत आहे, याचे प्रत्यंतर तरूणाईने दिले. 

तो कोण...कुठून आला...का थांबला...असे अनेक प्रश्न होते. वारणा नदीकाठावर पुलाच्या खालच्या बाजूस तो थांबला होता. त्याचं वय साधारण 28 ते 30 वर्षे. एकाच जागेवर कुणाशी काही न बोलता थांबला होता. लोक प्रश्नार्थक चेहऱ्याने पाहत होते. तो कोणाला प्रतिसादही देत नव्हता. अखेर तो बोलता झाला. त्याने दिलेल्या माहितीनुसार संपर्क साधून संबंधितांना बोलावण्यात आले. 

सामाजिक कार्यकर्ते संदीप चौगुले, पोलीस पाटील मोहन चांदणे यांनी त्याची चौकशी करण्याचा प्रयत्न केला. परंतू तो बोलत नव्हता. मनोरुग्ण असेल असा प्राथमिक अंदाज आल्याने त्यांनी त्याला विश्वासात घेऊन खाण्यास जेवण देऊ केले. नाव-गाव विचारले. तो म्हणाला, सुशील बापू देवकुळे. गाव मिरज तालुक्‍यातील संतोषवाडी. असंही तो म्हणाला. 

याच माहितीचा आधार घेत पोलीस पाटील मोहन चादंणे यांनी मोबाईल समाज माध्यमांच्या आधारे मिरज तालुक्‍यात काही पोलिस पाटलांशी संपर्क साधला. अखेर सुशील हा मनोरुग्ण आहे. खूप दिवसांपासून घरातून बेपत्ता झाला आहे. त्याची शोधाशोध सुरू आहे, अशी माहिती हाती लागली. नातेवाईकांना ऐतवडे खुर्दला बोलावण्यात आले. 

पोलिसांची मदत... 
कुरळपचे पोलिस निरीक्षक विवेक पाटील यांना माहिती देऊन त्या तरूणाला नातेवाईकांच्या मदतीने सातारा येथील यशोदा केंद्रात पाठवण्यात आले. ऐतवडे खुर्दचे पोलीस पाटील मोहन चांदणे, सामाजिक कार्यकर्ते संदीप चौगुले, संदीप कुंभार, मोहन कुंभार, दादासो पाटील, रवींद्र पाटील, दीपक तांबट, ग्रामपंचायत सदस्य तानाजी गायकवाड यांच्या सहकार्याने त्या तरूणाला आधार मिळाला. जीवघेण्या स्पर्धेत माणूसपण हरवत असतानाच्या काळात तरूणांनी वेगळाच आदर्श घालून दिला. त्याबद्दल ग्रामस्थांतून कौतूक होत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Santoshwadi Youngster get shelter special story