असा उडाला लग्नाचा बार; काेराेनाच्या मुकाबल्यासाठी मुख्यमंत्री निधीसह पालिकेस हजाराेंची मदत

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 26 मे 2020

नवरी मुलीचा भाऊ प्रसन्न हा नेव्हीमध्ये असल्याने तसेच चुलता व चुलती गोवा राज्यात असल्याने वधूमाता व पित्याशिवाय या लग्नाला कुटुंबातील कोणीही उपस्थित नव्हते. नवरदेवाची सख्खी बहीणसुद्धा या विवाहास उपस्थित नव्हती. परंतु, अनावश्‍यक खर्च टाळून कोरोना निधीसाठी रक्कम दिल्याने आमच्या आप्तेष्टांचे आशीर्वाद आम्हाला या रूपाने लाभल्याची भावना या वेळी वधू व वर यांनी बोलून दाखवली.

कवठे (जि.सातारा) : कवठे (ता. वाई) येथील राजेंद्र धर्माजी पोळ यांची कन्या पूजा व रहिमतपूर (ता.कोरेगाव) येथील बेदील उत्तमराव माने यांचे चिरंजीव अनिकेत यांचा विवाह चार महिन्यांपूर्वी निश्‍चित झाला. मोठ्या धुमधडाक्‍यात साखरपान सोहळा झाला. मात्र, कोरोनाच्या संकटामुळे विवाह साध्या पद्धतीने करण्याचे उभयतांनी ठरवले. सोहळा वधूच्या घरासमोर मंडप घालून मोजक्‍याच लोकांच्या उपस्थितीत झाला. या विवाह सोहळ्यासाठी खरे तर अनेक मान्यवर उपस्थित राहू शकले असते. परंतु, साध्या पद्धतीने विवाह पार पाडायचा ठरविल्याने कोणालाही निमंत्रण देण्यात आले नाही.
 
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपणसुद्धा समाजाचे देणे लागत असल्याची जाणीव उभय वधू-वर पक्षाला झाल्याने विवाहातील अनावश्‍यक खर्च टाळून त्याचा उपयोग समाजासाठी व कोरोनामुळे उद्‌भवलेल्या संकटाचा मुकाबला करण्यासाठी देण्याची कल्पना मांडली गेली. विवाहसोहळा सामाजिक अंतर व इतर सर्व नियम पाळून पार पाडण्यात आला. त्यानुसार वधू पक्षाकडून 51 हजार रुपये मुख्यमंत्री सहायता निधी कोविड-19 साठी देण्याचे ठरविले. वर पक्षाकडून 15 हजार रुपयांचा निधी रहिमतपूर नगरपालिकेसाठी देण्याचे ठरविण्यात आले. वधू पक्षाकडून 51 हजार रुपयांचा निधी सहकार व पणनमंत्री तथा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. रहिमतपूर नगरपालिकेसाठी वर पक्षाकडून 15 हजार रुपयांचा निधी हा रहिमतपूर नगरपरिषदेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष आनंदा कोरे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
 
या वेळी आमदार मकरंद पाटील, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष सुनील माने, पंचक्रोशी शिक्षण मंडळाच्या अध्यक्षा चित्रलेखा माने-कदम, नगरसेवक नीलेश माने, विनायक पाटील, अविनाश माने, सह्याद्री साखर कारखान्याचे संचालक लालासाहेब पाटील, कवठेचे सरपंच श्रीकांत वीर यांच्यासह मोजक्‍या लोकांच्या उपस्थितीत झाला. 

भाऊ नाही लग्नाला पण, मुख्यमंत्री निधीने आशीर्वाद मिळाला 

नवरी मुलीचा भाऊ प्रसन्न हा नेव्हीमध्ये असल्याने तसेच चुलता व चुलती गोवा राज्यात असल्याने वधूमाता व पित्याशिवाय या लग्नाला कुटुंबातील कोणीही उपस्थित नव्हते. नवरदेवाची सख्खी बहीणसुद्धा या विवाहास उपस्थित नव्हती. परंतु, अनावश्‍यक खर्च टाळून कोरोना निधीसाठी रक्कम दिल्याने आमच्या आप्तेष्टांचे आशीर्वाद आम्हाला या रूपाने लाभल्याची भावना या वेळी वधू व वर यांनी बोलून दाखवली.

लग्नापुर्वीच जाेडीने महाराष्ट्रात धमाल उडवून दिली; सुप्रिया सुळेही खूष 

केंद्र सरकारने न्याय योजना लागू करावी; युवक काॅंग्रेसची मागणी

पक्षाच्या शेवटच्या कार्यकर्त्यांपर्यंत ही सूचना पाेचवा : पालकमंत्री बाळासाहेब पाटील

कन्या शाळेतील चिमुकलीने पॉकेटमनीतून भागवली गरजूंची भूक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Newly Married Couple Donated Fund To Covid 19 Relief Fund