कन्या शाळेतील चिमुकलीने पॉकेटमनीतून भागवली गरजूंची भूक

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 25 मे 2020

कोरोनाच्या लढ्यात सहभागी व्हावे, असे मानसीला सातत्याने वाटत होते. तिने तो दिवस साधलाही. तिला दिल्या जाणारा पॉकेटमनी तिने वर्षभर जपला होता. त्यातून तिने मदतीचा निर्णय घेतला.

कऱ्हाड (जि.सातारा) ः लहान मुलांचा वाढदिवस म्हणजे त्यांच्या आनंदाची पर्वणी असते. मात्र, येथील आठवीत शिकणाऱ्या मानसी सागर बर्गे या चिमुरडीने वाढदिवस साजरा न करता त्यासाठी साठवलेल्या पैसातून तब्बल शंभर लोकांना शिवभोजन थाळीचे जेवण देऊन त्यांची भूक भागवली. त्याचबरोबर या काळात पोलिसांची भूमिका महत्त्वाची असते. ती ओळखून तिने तब्बल 400 पोलिसांना सॅनिटायझरचे वाटप केले. आपल्या वर्षभरातील पॉकेटमनी तिने समाजकार्यासाठी वेगवेगळ्या माध्यमातून खर्च केल्याने तिचे शहरात कौतुक होत आहे.
 
कोरोनाच्या लढ्यात आपणही सहभागी व्हावे, असे मानसीला सातत्याने वाटत होते. तिने तो दिवस साधलाही. स्वतःचा वाढदिवस नुकताच तिने वेगळ्या पद्धतीने साजरा केला. तिला दिल्या जाणारा पॉकेटमनी तिने वर्षभर जपला होता. तिने जमवलेल्या पैशातून ज्यांना जेवण मिळत नाही, अशा तब्बल शंभरपेक्षाही जास्त लोकांना शिवभोजन थाळीचे जेवण दिले. त्याशिवाय तिने स्वतः 20 पेक्षा जास्त कुटुंबांना जावून धान्य वाटले. कोरोनाशी दोन हात करणाऱ्या पोलिसदादांची भूमिकाही महत्त्वपूर्ण ठरते. त्या तब्बल 400 पोलिसदादांना तिने सॅनिटायझरचे वाटप केले. खाऊच्या साठलेल्या वर्षभरातील पैशातून गरजूंना जीवनावश्‍यक धान्य वाटले. भुकेल्यांना पोटभर जेवण दिले. पोलिसांना सॅनिटायझर वाटले, या चिमुकल्या मानसीच्या उपक्रमाने पोलिस अधिकारीही भारावून गेले.

येथील कन्या शाळेतील इयत्ता आठवीमध्ये शिकणारी मानसीने वाढदिवस न करण्याचा संकल्प केला. ते तिने घराच्यांनाही सांगितले. स्वतः साठवलेली तब्बल 20 हजारांहून जास्त रकमेतून समाजासाठी काही उपक्रम राबविण्याचे ठरविले. वडील सागर बर्गे यांच्याशी तिने चर्चा केली. त्यातून गरजूंना मदत करण्याचे ठरविले. त्यानुसार सागर बर्गे यांनी मुख्यमंत्री सहायता निधीला मदतीचा धनादेश पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्याकडे सुपूर्द केला. पोलिसांना सॅनिटायझरचे वाटप केले. गरजू महिलांना जीवनावश्‍यक धान्याचे वाटप केले. पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव, वरिष्ठ पोलिस निरीक्षक बी. आर. पाटील उपस्थित होते. शिवभोजन लाभार्थ्यांची रक्कम भोजनालयात सुपूर्द केली. या वेळी तब्बल शंभराहून अधिक लोकांची मानसीने भूक भागवली. त्या शिवभोजनाचे वाटप मानसीच्या हस्ते झाले. त्यावेळी ऍड. विकास पवार, विष्णू पाटसकर, दादा शिंगण, रमेश वायदंडे, प्रमोद पाटील, रोहित पवार, अजिंक्‍य मोहिते उपस्थित होते.

लढा कोरोनाचा : काळजी करु नका, बाळाची आणि आईची प्रकृती स्थिर आहे असे डाॅक्टरांनी सांगताच सर्वांचे चेहरे खूलले

सरकार आमचं नाही; काॅंग्रेसच्या महाराष्ट्रातील माेठ्या नेत्याची क्लिप व्हायरल

जवानांकडून क्वारंटाइनमध्येही आगळी कृतज्ञता

हरवलेले पाकीट सोशल मीडियामुळे परत, जवान व गुरुजींची तत्परता


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Satara Girl Served Food To Migrants In Karad City