esakal | ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता असली, तरी मूलभूत सुविधा नाहीत; वर्षा देशपांडेंनी व्यक्त केली खंत

बोलून बातमी शोधा

Satara Latest Marathi News}

ग्रामीण भागातील विद्यार्थीवर्गाकडे गुणवत्ता असली तरी मूलभूत सुविधा नसल्याची खंत ऍड. वर्षा देशपांडे यांनी व्यक्त केली.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांकडे गुणवत्ता असली, तरी मूलभूत सुविधा नाहीत; वर्षा देशपांडेंनी व्यक्त केली खंत
sakal_logo
By
विजय लाड

कोयनानगर (जि. सातारा) : कोयना विभागातील ग्रामीण शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण मिळणे दुरापास्त झाले आहे. विद्यार्थ्यांची गुणवत्तावाढ व विकासासाठी शिक्षक कटिबद्ध असले तरी मूलभूत सोयी-सुविधा नसल्याने विद्यार्थी स्पर्धेतून बाहेर फेकले जात असल्याचे चित्र आहे. हे चित्र बदलण्याचा विडा लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून सातारा येथील प्रसिध्द उद्योजक फरोख कूपर यांची कन्या मनीषा कूपर यांनी घेतला आहे. कोयना विभागातील सर्व शाळांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी दत्तक घेतल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. 

मनीषा कूपर यांच्या वाढदिवसानिमित्त सातारा येथील लेक लाडकी अभियानाच्या माध्यमातून कोयना विभागातील हेळवाक प्राथमिक शाळेला संपूर्ण पत्रा शौचालय, रासाटी कुंभारवाडा येथील सभामंडपाला फरशी व कोयना धरणाच्या सुरक्षेसाठी बंदोबस्तावर असणाऱ्या पोलिस जवानांना वॉटर फिल्टर आदी देण्यात आले. या वेळी झालेल्या कार्यक्रमात कूपर बोलत होत्या. या वेळी लेक लाडकी अभियानाच्या प्रमुख ऍड. वर्षा देशपांडे, ऍड. शैला जाधव, हेळवाक ग्रामपंचायतीच्या सरपंच शैला कदम, शाळेचे मुख्याध्यापक आनंद चाळके, रवींद्र सपकाळ, संजय कुंभार आदी उपस्थित होते. 

शुभमंगल सावधानसाठी आता फक्त 50 जणांचीच उपस्थिती; जिल्ह्यात नवी नियमावली जाहीर

ऍड. देशपांडे म्हणाल्या, "ग्रामीण भागातील विद्यार्थीवर्गाकडे गुणवत्ता असली तरी मूलभूत सुविधा नाहीत. लेक लाडकी अभियानाच्या वतीने केलेल्या आवाहनाला मनीषा कूपर यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे. दुर्गम व ग्रामीण असणाऱ्या कोयना विभागातील शाळांतील विद्यार्थ्यांना मूलभूत सोयी-सुविधा पुरविण्यासाठी दत्तक घेऊन सामाजिक बांधिलकी जपण्याचे महत्त्वपूर्ण काम केले आहे.'' शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दुर्गेश कारंडे यांनी स्वागत केले. संदीप पवार यांनी आभार मानले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे