आरोस धनगरवाडी शाळा झाली डिजिटल

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 4 ऑगस्ट 2017

सावंतवाडी - आरोस धनगरवाडी येथील शाळेच्या उत्कर्षासाठी आम्ही नेहमीच योगदान देत आहोत. तसेच शाळेच्या आजच्या या डिजिटल उपक्रमासाठी शिक्षक, पालक, ग्रामस्थांचे मिळालेले सहकार्य कौतुकास्पद आहे, असे मत आरोस सरपंच साक्षी नाईक यांनी व्यक्त केले.

या वेळी कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य राजन मुळीक, केंद्रप्रमुख कमलाकर ठाकूर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष मंगेश येडगे, ग्रामपंचायत सदस्य गजानन परब तसेच अंकुश आरोसकर, अश्विनी नाईक, गजानन नाईक, राजन नाईक, शिवाजी परब, गुरुनाथ नाईक, हेमंत मराठे, सर्व शाळांचे मुख्याध्यापक, धनगरवाडीतील सर्व ग्रामस्थ, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. आरोस गावासारख्या दुर्गम भागातील पहिली ते पाचवीचे वर्ग असणारी व पटसंख्या पंधरा असणारी आरोस केंद्रातील तिसरी डिजिटल शाळा होण्याचा मान जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धनगरवाडी, आरोसने 

मिळविला.  या वेळी शाळा जमीन मालक श्रीमती भागीरथी लक्ष्मण कोकरे, बालवाडीच्या सौ. दर्शना परब व श्रीकांत कोकरे यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रल्हाद कांबळे यांनी केले. प्रास्ताविक व आभार बाळु कुऱ्हाडे यांनी मानले.

Web Title: sawantwadi news digital school