मुलाच्या विवाहानिमित्त शाळेला देणगी

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 23 जून 2018

नागठाणे - मुलाच्या लग्नाचा आनंद द्विगुणित करताना संगीता भोसले यांनी आसनगाव (ता. सातारा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस देणगी दिली. त्यांच्या उपक्रमाचे कौतुक होत आहेत.

संगीता भोसले या प्राथमिक शिक्षिका, तर त्यांचे पती कल्याणराव भोसले हे सेवानिवृत्त शिक्षक आहेत. सौ. भोसले या आसनगाव येथील प्राथमिक शाळेत मुख्याध्यापकपदी कार्यरत आहेत. ज्ञानरचनावादी शाळा असा या शाळेचा लौकिक आहे. 

राज्यातील हजारो शिक्षकांनी आजवर या शाळेस भेट दिली आहे. नुकतेच भोसले यांच्या रोहित या मुलाचे लग्न झाले. या लग्नाचे औचित्य साधताना भोसले दांपत्याने आसनगाव शाळेस दहा हजार रुपयांची देणगी दिली. 

विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे, केंद्रप्रमुख सरस्वती राजमाने, माणिक पाटील, शिवाजी मोरे, तानाजी सराटे आदींच्या उपस्थितीत ही देणगी शाळेकडे सुपूर्द करण्यात आली. त्यांच्या या उपक्रमाचे गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ यांच्यासह आसनगाव ग्रामस्थांनी कौतुक केले.

लग्नासारख्या मंगल क्षणी शाळेला मदतीचा अल्प हातभार लावताना मनस्वी आनंद होत आहे. असे उपक्रम समाजात रुजणे आवश्‍यक आहे.
- संगीता भोसले, मुख्याध्यापिका, आसनगाव (ता. सातारा)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: school donation for son marriage motivation