...अन्‌ तिने कापल्या जटा

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 28 ऑगस्ट 2018

पिंपरी - निळा गणवेश आणि बादलीबरोबरच तिच्या केसांच्या जटा हे तिच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग बनले होते. मात्र, त्या कापल्यास आपल्याला किंवा आपल्या परिवारास अपाय होण्याच्या अंधविश्वासावर मात करून तिने अखेर जटा कापल्या. हाजा दत्ता देढे असे या कचरावेचक महिलेचे नाव. तिने केलेले धाडस हा सर्वांच्याच चर्चेचा विषय ठरले आहे. 

स्वच्छ आणि कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायतीच्या वतीने कचरावेचकांसाठी शहरभरात प्रशिक्षण मालिका आयोजित केली आहे. मराठी विज्ञान परिषदेच्या सहकार्याने आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमात उत्क्रांतीचे स्पष्टीकरण दिले गेले. ‘आलोचना’च्या कार्यकर्त्यांनी बाल लैंगिक अत्याचारावर सत्र घेतले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने अंधविश्वासावर मार्गदर्शन केले. या सत्रामुळे हाजा दत्ता देढे यांचे विचार बदलले. त्यातून त्यांनी जटा कापण्याचा निर्णय घेतला. 

हाजाबाई म्हणाल्या, ‘‘बटांमुळे त्रास होतो. त्या कापल्यास तुम्हालाच वेदनेपासून मुक्ती मिळेल, असा सल्ला अनेकांनी मला दिला होता. मात्र, अंधश्रद्धेवरील सत्रातून माझे विचार बदलले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या नंदिनी जाधव यांच्याशी चर्चा करून बटा कापण्याचा निर्णय मी घेतला. 

लक्ष्मी नारायणन्‌ म्हणाल्या, ‘‘असा बदल पचवणे कठीण आहे. पण मनात खोलवर रुजलेली श्रद्धा आणि विश्वास याबाबतीत बदल स्वीकारणे खूप कठीण होते. कागद, काच, पत्रा कष्टकरी पंचायत हाजासारख्या कचरावेचक सदस्यांना, जे स्वत-ला, त्यांच्या विश्वासांना, त्यांच्या विचारसरणीला आव्हान देण्यास आणि त्याप्रमाणे आचरण बदलण्यास तयार आहेत.’’

Web Title: She finally cut her hair overcome superstitions