हो...त्याने केले क्षणांत 50 हजार परत

सकाळ वृत्तसेवा
Friday, 3 January 2020

सातारा शहारतील एकाने रिक्षात सापडलेला किंमती माेबाईल महिलेस परत केला. तसेच एकाने आपल्या बॅंक खात्यावर काेणाचे तरी चुकुन आलेली हजाराे रुपयांची रक्कम ज्याची त्याला परत केली.
 

सातारा : सहज, फुकट, बिन कष्टाचे आपाेआप काेणाला काही मिळाले तर नकाे म्हणणारे सध्याच्या युगात हाताच्या बाेटावर माेजण्या इतकेही भेटणार नाहीत. परंतु साताराच्या मातीलाच प्रामाणिकपणाचा गंध आहे की काय अशा घटना येथे आज (शुक्रवार) घडल्या.

सातारा बसस्थानकासमाेर जयराज माेरे यांचे दुकान आहे. आज (शुक्रवार) सकाळी साडे दहाच्या सुमारास त्यांच्या बॅंक खात्यावर ५० हजार रुपये जमा झाले. त्याचा संदेश माेरे यांच्या माेबाईलवर खणखणताच न केलेल्या व्यवहाराची रक्कम पाहून ते चक्रावले.

जरुर वाचा : Video : चला फ्लेमिंगोसह रंगबेरंगी पक्षी निरीक्षणासाठी 

अशिष नामदेव पवार यांच्याकडून माेरे यांच्या खात्यावर डिजीटल पद्धतीने  ५० हजार जमा करण्यात आले हाेते. माेरे यांनी तातडीने त्यांच्या फेसबुक अकाैंटवर अशिष हे आपले मित्र आहेत का हे तपासू लागले. तेवढयात माेेरेंच्या दुकाना समोर एक गाडी थांबली. त्यामधून एक व्यक्ती थेट माेरेंच्या दुकानात धावतच गेली. संबंधित व्यक्तीने चुकुन तुमच्या खात्यावर पैसे आल्याचे सांगितले. त्यावेळी माेरेंना हायसे वाटले. त्यांनी क्षणाचा ही विलंब न करता पवार यांचे पैसे त्यांना परत देऊ केले. 

दरम्यान अशिष पवार यांनी दोनच दिवसांपुर्वी माझ्या दुकानातून खरेदी केली हाेती. त्यावेळी झालेल्या डिजीटल व्यवहारातून माझा माेबाईल क्रमांक त्यांच्याकडे गेला हाेता. आज गडबडीत त्यांनी पून्हा माझ्याच खात्यात रक्कम जमा केली हाेती. त्यांची त्यांना रक्कम परत केल्याचे मला समाधान वाटल्याचे जयराज माेरे यांनी सांगितले. 

रिक्षा चालक सादिक शेखचा प्रामाणिकपणा

सातारा येथील मुख्य बसस्थानकावरुन आश्विनी शिंदे यांनी देवी चाैकपर्यंत रिक्षाने प्रवास केला. देवी चाैक येथे उतरल्यानंतर शिंदे या त्यांच्या कामासाठी गेल्या. काही वेळानंतर रिक्षा चालक सादिक आबिद शेख यांना शिंदे या आपल्या गाडीत माेबाईल विसल्याचे लक्षात आले. त्यांनी माेती चाैक येथे वाहतुक सुरळीत करण्यासाठी कार्यरत असलेले महिला पाेलिस रेश्मा तांबाेळी यांना याबाबत माहिती दिली.

हेही वाचा : चालून आलेली हज़ारोंची लक्ष्मी धनाजीने प्रामाणिकपणे परत केली

सादिक शेख यांनी संबंधित माेबाईल महिला पाेलिस तांबाेळी यांच्याकडे दिला. ताेपर्यंत शिंदे यांनीही त्यांच्या माेबाईलवर संपर्क साधत माेती चाैक गाठला. तेथे शेख यांनी शिंदे यांचा माेबाईल परत केला. त्यावेळी शिंदे यांच्या चेहरा खूलला. महिला पाेलिस तांबाेळी यांनी रिक्षा चालक सादिक शेख (MH11AG 0959) यांच्या प्रामाणिकपणाचे काैतुक केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shopkeeper Returned 50 Thousand Ruppees Honestly To Customer In Satara