अनेक निराधारांसाठी तो बनला श्रावणबाळ

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 27 जून 2017

अणदूर येथील रिक्षाचालक सोमनाथ बेंद्रेची समाजसेवा

अणदूर - अणदूर परिसरातील अनेक वृद्ध, अंध-अपंग, अपत्यहीन व निराधारांसाठी सोमनाथ बेंद्रे हा रिक्षाचालक श्रावणबाळ बनला आहे. आपल्या रिक्षातून असहाय लोकांना अत्यल्प मोबदला घेऊन तर कधी मोफत ईप्सित ठिकाणी पोहोचवण्याचे कार्य तो गेली पाच वर्षे करतो आहे. एकीकडे अनेक रिक्षाचालक अशा असहाय नागरिकांना त्यांच्या रिक्षात बसवण्याचे टाळतात. पण सोमनाथ बेंद्रे हा युवक त्यांचाच आधार बनला आहे. 

सोमनाथ विठ्ठल बेंद्रे याची घरची परिस्थिती अत्यंत हलाखीची असून मागील पाच वर्षांपासून तो रिक्षा चालवून उदरनिर्वाह करत आहे. वृद्ध, अंध-अपंग, निराधार, शारीरिकदृष्ट्या असहाय असलेल्या नागरिकांना खऱ्या आधाराची गरज असते हे ओळखून त्यांना आपल्या रिक्षातून इच्छित ठिकाणी पोहचवण्याचे काम तो करत असतो. अपंग, वृद्धांना रिक्षातून चढउतार करणे, त्यांना कार्यालयात घेऊन जात त्यांच्या मुलांचे कर्तव्य पार तो पाडतो. 

गरजूंना रिक्षात बसवून रुग्णालयात घेऊन जाणे, मासिक पेन्शन योजनेची रक्कम काढण्यासाठी बॅंकेतील अर्ज भरणे, स्वस्त धान्य दुकानातील धान्य घरपोच करणे, वीजबिल भरणे, गॅस आणणे, बाजारातील वस्तू आणून देणे अशी कामेही सोमनाथ पाच वर्षांपासून अविरतपणे करीत आहे. रात्री-अपरात्री रुग्णालयात जाण्याची गरज भासल्यास हक्काचा माणूस म्हणून आधी सोमनाथला बोलावले जाते. तेवढ्याच तत्परतेने सोमनाथ रिक्षातून रुग्णालयात पोचवितो. ज्यांची ऐपत आहे त्यांच्याकडून अगदी अत्यल्प तर जे मोबदला देऊ शकत नाहीत त्यांना तो मोफत सेवा देतो. गावातील अनेक वृद्ध, अंध-अपंग, असहाय नागरिकांचा सोमनाथ आधार बनला आहे. 

बहुतांश रिक्षाचालक अंध-अपंग, निराधार, वृद्ध व गरिबांकडे दुर्लक्ष करतात. नको ती कटकट म्हणून असे प्रवासी टाळतात हे मी अनेकवेळा पाहिले आहे. त्यांची असहायता ओळखून मी अशा गरजूंना मनापासून मदत करतो. प्रेमाने बोलतो, प्रसंगी पैसे नसलेल्यांनाही मदत करतो. म्हणून दिवसभर क्षणभरही उसंत मिळत नाही. एखादा व्यवसाय सेवा समजून केल्यास मिळणारे समाधान मी अनुभवतो आहे. 
- सोमनाथ बेंद्रे

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Shravanabal became the foundation for many reformers