#WendesdayMotivation विद्यार्थ्यांकडून निराधारांना माणुसकीची उब 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 4 March 2020

थंडीत निराधार लहान मुले, स्त्री-पुरुष उघड्यावर झोपलेली पाहून विद्यार्थ्यांची मनं हेलावले. त्यामुळे निराधार लोकांना मदत करण्याबाबत विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितले. विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी साड्या, पॅंट, शर्ट, ब्लॅंकेट, स्वेटर, जर्कीन खरेदी केले. रात्री साडेनऊ ते अकरा या वेळेत विद्यार्थी व शिक्षकांनी थंडीत उघड्यावर पडलेल्या निराधार लोकांना शोधून ब्लॅंकेट, साड्या, सतरंजी, शाली यांचे वाटप केले.

कऱ्हाड : दहावीची परीक्षा जवळ आल्याने विद्यार्थ्यांचे निरोप समारंभ विविध उपक्रमांनी साजरे होत आहेत. मात्र, येथील टिळक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी शाळेचा निरोप घेताना परिसरातील बेवारस, निराधार, गोरगरीब लोकांना मायेची उबदार शाल पांघरूण माणुसकी दाखवली आहे. 

दहावीची परीक्षेस मंगळवारपासून (ता. तीन मार्च) प्रारंभ झाला आहे. ज्या शाळेत पाचवी ते दहावीपर्यंत विद्यार्थी शिकले, त्या विद्यार्थ्यांना नुकताच निरोप देण्याचे समारंभ झाला. टिळक हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी परिसरातील गोरगरीब, निराधार, बेवारस लोकांना थंडीपासून संरक्षणासाठी उबदार कपडे, साड्या, स्वेटर, जरकीन, ब्लॅंकेट, सतरंजी अशा वस्तू देण्याचे ठरवले. मुख्याध्यापक जी. जी. अहिरे, उपमुख्याध्यापक के. पी. वाघमारे, पर्यवेक्षक शरद शिंदे, यु. एस. बाबर यांनी या उपक्रमाला सकारात्मकता दर्शवली. वर्गशिक्षक भरत कदम, शिक्षक अविनाश भांदिर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी परिसरातील गरीब, निराधार लोकांची प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली.

थंडीत निराधार लहान मुले, स्त्री-पुरुष उघड्यावर झोपलेली पाहून विद्यार्थ्यांची मनं हेलावले. त्यामुळे निराधार लोकांना मदत करण्याबाबत विद्यार्थ्यांनी पालकांना सांगितले. विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी साड्या, पॅंट, शर्ट, ब्लॅंकेट, स्वेटर, जर्कीन खरेदी केले. रात्री साडेनऊ ते अकरा या वेळेत विद्यार्थी व शिक्षकांनी थंडीत उघड्यावर पडलेल्या निराधार लोकांना शोधून ब्लॅंकेट, साड्या, सतरंजी, शाली यांचे वाटप केले.

"जानकी'वर रविवारी महिलांसाठी बक्षिसे 

काशीळ : जागतिक महिला दिनानिमित्त रविवारी (ता. आठ) बोरगाव (ता. सातारा) येथील जानकी कृषी पर्यटन केंद्रावर येणाऱ्या महिलांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आल्याची माहिती शहाजी साळुंखे यांनी दिली.

जरुर वाचा : भिऊ नका : पोलिस दल महिलांच्या पाठीशी

महिला दिनानिमित्त महिलांसाठी विशेष "लकी ड्रॉ'चे आयोजन करण्यात आले आहे. प्रथम विजेत्या महिलेस पेशवाई पैठणी, द्वितीय विजेत्या महिलेस मोत्याची नथ, तिसऱ्या विजेत्या महिलेस पर्स बक्षीस देण्यात येणार आहे. अधिक माहितीसाठी जानकी कृषी पर्यटन केंद्रात संपर्क साधावा, असे आवाहन श्री. साळुंखे यांनी केले आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: SSC Students Helped Orphans From Karad