चिमुकल्यांच्या आकाशकंदिलांनी उजळणार घरे

सुनील शेडगे
बुधवार, 31 ऑक्टोबर 2018

नागठाणे - दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी एरवी आकाशकंदील म्हणजे दुर्लभ बाब. याच भागातील मोरबाग शाळेच्या मुलांनी नवनिर्मितीचा प्रत्यय देताना स्वतः आकाशकंदील तयार केले आहेत. त्यातून यंदाच्या दिवाळीत प्रथमच इथली घरे आकाशकंदिलांच्या प्रकाशात उजळणार आहेत.

नागठाणे - दुर्गम भागातील विद्यार्थ्यांसाठी एरवी आकाशकंदील म्हणजे दुर्लभ बाब. याच भागातील मोरबाग शाळेच्या मुलांनी नवनिर्मितीचा प्रत्यय देताना स्वतः आकाशकंदील तयार केले आहेत. त्यातून यंदाच्या दिवाळीत प्रथमच इथली घरे आकाशकंदिलांच्या प्रकाशात उजळणार आहेत.

मोरबाग हे सातारा तालुक्‍यातील गाव. ठोसेघर परिसरात वसलेले. गावाचा समावेश दुर्गम भागात होतो. भोवताली सर्वत्र जंगल. अशा गावातील शाळेत आकाशकंदील तयार करण्याची कार्यशाळा झाली. इथल्या मुलांसाठी आकाशकंदील ही तशी दुर्लभ बाब. मात्र, यंदाच्या दिवाळीत मुलांनी स्वतःच्या हातांनी बनविलेल्या आकाशकंदिलाची भेट घरच्यांना दिली आहे. गणेश शिंदे या शिक्षकाने याकामी पुढाकार घेतला. त्यांनी मुलांना आकाशकंदील बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले. त्यासाठी फाईल कार्ड पेपर, टिंटेड पेपर, फ्लोरोसन पेपर, पताका पेपरचा वापर केला. त्यातून अत्यंत सुबक, आकर्षक आकाशकंदील आकारास आले. मुख्याध्यापक विश्वास कवडे, राहुल सावंत, विजय कदम यांनीही मार्गदर्शन केले. केंद्रप्रमुख दादाजी बागूल, शाळा समितीच्या अध्यक्षा छाया माने यांनी शाळेस भेट देऊन कौतुक केले. गटशिक्षणाधिकारी संजय धुमाळ, विस्तार अधिकारी जयश्री शिंगाडे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.

ग्रामीण भागातील मुलांमध्ये अंगभूत कलाकौशल्ये असतात. त्यांना योग्य मार्गदर्शन लाभले तर त्यांचे भावविश्‍व खऱ्या अर्थाने फुलते.
- गणेश शिंदे, मार्गदर्शक शिक्षक, मोरबाग


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Student Sky Lantern Life