जिल्हा परिषदेच्या शाळेत ‘स्टडी फ्रॉम होम’

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 19 March 2020

कोरोनामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा ३१ मार्चपर्यंत बंद असल्या तरी जिल्हा परिषदेच्या वाबळेवाडी (ता. शिरूर) आंतरराष्ट्रीय विद्यालयात मात्र विद्यार्थ्यांना झूम-मीटिंग ॲप्लिकेशनद्वारे दररोज तीन तासांचे ऑनलाइन शिक्षण चालू आहे. 

शिक्रापूर - कोरोनामुळे जिल्ह्यातील सर्व शाळा ३१ मार्चपर्यंत बंद असल्या तरी जिल्हा परिषदेच्या वाबळेवाडी (ता. शिरूर) आंतरराष्ट्रीय विद्यालयात मात्र विद्यार्थ्यांना झूम-मीटिंग ॲप्लिकेशनद्वारे दररोज तीन तासांचे ऑनलाइन शिक्षण चालू आहे. 

आता बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

इयत्ता सहावी ते नववीचे सर्व ११६ विद्यार्थ्यांनी या ऑनलाइन शिक्षणात लॅपटॉप किंवा मोबाईलद्वारे भाग घेतला. सर्व विद्यार्थी एकाच ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर येतील व ते सर्वांना सोईस्कर असेल असे ॲप्लिकेशन सापडले आणि त्या झूम-मीटिंग ॲप्लिकेशनची चाचणीही घेण्यात आली. त्यानुसार मंगळवारी (ता. १७) इयत्ता सहावी ते नववीच्या विद्यार्थ्यांना आयडी व पासवर्ड काढायला लावून सर्वांना या ॲप्लिकेशनला कसे कनेक्‍ट व्हायचे हे सांगितले गेले. त्यानुसार दुपारी एक ते दोन व संध्याकाळी सहा ते साडेआठ या वेळेत सर्व विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाच्या प्रवेश परीक्षांसाठी आवश्‍यक फाउंडेशन अभ्यासक्रमातील अनुक्रमे भौतिकशास्त्र व गणित हे विषय वाबळेवाडी शाळेतून कुणाल गडेकर व रवी राठोड यांनी शिकविले. इयत्ता सहावी ते नववीचे वर्गशिक्षक शरीफा तांबोळी, संदीप गिते, जयश्री पलांडे व स्वतः: मुख्याध्यापक दत्तात्रेय वाबळे यांनी भाग घेतला. 

झूम-मीटिंग असे चालते..!
या ॲप्लिकेशनद्वारे मीटिंगचा आयडी-पासवर्ड काढल्यावर ग्रुपमध्ये सहभागी होता येते. एक शिक्षक शिकविताना सर्वांना दिसू शकतात तर एकाच वेळी चार जणांना स्क्रीनवर यातील कुणालाही घेता येते. प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत शिक्षकांना थेट पोचता येते आणि वर्गासारखे संवाद इथे करता येतात.            

माझी इयत्ता सातवीतील मुलगी या अभिनव उपक्रमात सहभागी झाली. तसेच तिचा सध्या जो फाउंडेशनचा अभ्यास सुरू आहे त्याला अनुसरून तयार केलेला अभ्यासक्रमही तिला चांगला समजला.
- रघुनंदन गवारे, पालक


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Study from home in zp school

Tags
टॉपिकस
Topic Tags: