सोशल मीडियावरून उभारली ‘कपडा बॅंक’

नीलेश डाखोरे
रविवार, 27 मे 2018

नागपूर - आजघडीला प्रत्येकजण सोशल मीडियाचा वापर करीत आहे. मात्र, याचा चांगल्या गोष्टीसाठी कमी आणि वाईट गोष्टीसाठी जास्त वापर होताना दिसतो. याला शिक्षक समीर मुरलीधर काळे अपवाद ठरले आहेत. त्यांनी सोशल मीडियाचा वापर करून गरिबांसाठी ‘कपडा बॅंक’ अघडली. कपडे दान करीत गरिबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविण्याचे कार्य ते करत आहेत.

संत मायकल प्राथमिक शाळेचे शिक्षक व वसुंधरा प्रतिष्ठानचे नागपूर प्रमुख काळे यांनी समाजाला काही देणे लागते या उद्देशातून ‘कपडा बॅंक’ उघडली. कपडे देण्यासाठी नागरिकांना आवाहन केले. कालांतराने फेसबुक, व्हॉटसॲप, ट्विटर आदींच्या माध्यमातून वापरात नसलेले जुने व नवीन पण स्वच्छ आणि धुतलेले कपडे देण्याचे आवाहन त्यांनी केले. 

अल्पावधीतच त्यांना यश आले असून, नागरिक त्यांना फोन करून कपडे घेऊन जाण्यास बोलवितात. दरवर्षी गरीब, गरजू व आदिवासी गरीब मुला-मुलींना या कपड्यांचे वाटप करण्यात येते. आरोग्यमित्र म्हणूनही काळे यांची ओळख आहे. नागपुरात विदर्भातील रुग्ण उपचारासाठी येतात. कुणाचाही फोन आल्यास ते मदतीसाठी धावून जातात. कुणालाही जुने वा नवीन कपडे द्यायचे असल्यास त्यांनी समीर काळे यांच्याशी ९५४५९७२४२५ या क्रमांकावर संपर्क साधावा.

गरिबांची सेवा हे कर्तव्य
आरोग्यमित्राची प्रेरणा आमदार बच्चू कडू यांच्याकडून मिळाली. मेडिकल, मेयो व खासगी रुग्णालयात बाहेर गावावरून आलेल्या रुग्णांची सेवा करणे, रक्‍त उपलब्ध करूने देणे, गरीब रुग्णांना घरून जेवणाचा डब्बा पोचवने हे आपले कर्तव्य असल्याचे समीर काळे म्हणतात.

मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी मातृदिनी मुलींना जन्म देणाऱ्या मातांना साड्यांचे वाटप केले. नागपूर शहरामध्ये २५ कपडा बॅंक केंद्र सुरू करण्याचा मानस आहे.
- समीर काळे, शिक्षक व समाजसेवी.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Textile Bank built on social media motivation samir kale