शिवपार्थच्या वडिलांना सकाळच्या माध्यमातून नोकरी 

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 25 मार्च 2017

सोलापूर - अवयवदान करून चार जणांचे प्राण वाचविणाऱ्या शिवपार्थ कोळी याच्या वडील शिवशंकर कोळी सकाळच्या माध्यमातून नोकरी मिळाली आहे. श्री. कोळी यांना सोलापूर येथील युनिटी मल्टीकॉंन कंपनीने नोकरी दिली आहे. 

फुटबॉल खेळत असताना शिवपार्थ काळी याचा ब्रेन डेड झाल्याने मृत्यू झाला होता. शिवपार्थच्या वडिलांनी धाडसी निर्णय घेत शिवपार्थचे अवयव दान करण्याचा निर्णय घेतला होता. त्यानुसार सोलापुरातील कुंभारी येथील अश्‍विनी ग्रामीण रुग्णालयात शस्त्रक्रिया करून दोन किडनी, यकृत व हृदय असे चार अवयव काढून गरजू रुग्णांना देण्यात आले होते. शिवशंकर कोळी यांच्या निर्णयामुळे चार जणांचे प्राण वाचले. 

देशभरात अवयवाच्या प्रतीक्षेत अनेक लोक असताना शिवशंकर कोळी यांनी सर्वांसमोर एक आदर्श निर्माण केला आहे. सकाळच्या माध्यमातून शिवशंकर कोळी यांना नोकरी देण्यात आली. 

शिवपार्थ कोळी याचे वडील शिवशंकर कोळी यांना युनिटी मल्टीकॉंन कंपनीत नोकरीचे नियुक्ती पत्र देण्यात आले. या वेळी पुरातत्त्व विभागाचे अजित खंदारे, सोलापूर सकाळचे सहयोगी संपादक अभय दिवाणजी, औरंगाबाद विभागाचे यशवंत भंडारे, युनिटीचे कफील मौलवी आदी उपस्थित होते.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: through his father's job by sakal