तिबेटियनांनी जपली सामाजिक बांधिलकी

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 14 डिसेंबर 2018

सातारा - हिमालयाच्या कुशीतून हजारो मैल येथे पोटासाठी आलेल्या तिबेटियन नागरिकांनी सामाजिक बांधिलकीचे अनोखे दर्शन सातारकरांना घडविले असून, त्यांनी येथील पुरुष भिक्षेकरीगृहातील ८० पुरुष सदस्यांना त्यांना हवे तसे उबदार स्वेटर दिले. कडाक्‍यांच्या थंडीत मिळालेली ही बांधिलकीची उब भिक्षेकऱ्यांना सुखावून गेली.

येथील पंचायत समिती कार्यालयानजीक तिबेटियन विक्रेते आपला व्यवसाय सचोटीने करत आहेत. दूर प्रांतातून आले असले तरी त्यांनी साताऱ्याच्या मातीशी एकरुप होत आपले रितीरिवाज सांभाळले आहेत. श्रीमती अथेन फुन्त्सोक, श्रीमती नवांग, श्रीमती ताशी ग्योत्सेन, श्रीमती तेन्झीन लोडे, पेमा गेल्पो, त्सेतान न्गोडुप, श्रीमती ताशी पुन्त्सोक ते त्यांचे सणवारही तेवढ्याच उत्साहाने साजरे करतात. अगदी त्यांचे धर्मगुरू दलाई लामा यांचा वाढदिवसही उत्साहाने साजरा करतात. दलाई लामांना नोबेल पारितोषिक मिळून २९ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने त्यांनी नुकतेच सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. 

येथे असलेल्या पुरुष भिक्षेकरीगृहात सुमारे ८० भिक्षेकरी आहेत. शासनाची मदत आणि समाजातील दानशूरांनी केलेल्या मदतीवर त्यांचा उदरनिर्वाह सुरू आहे.

सध्या साताऱ्यात कडाक्‍याची थंडी पडत आहे. या सर्व भिक्षेकऱ्यांना या थंडीत उबदार आणि दर्जेदार स्वेटर देण्याचे या तिबेटियन नागरिकांनी ठरविले आणि भिक्षेकऱ्यांच्या मापानुसार त्यांनी सर्वांना नुकतेच स्वेटर दिले. या उबदार स्वेटरनी सारे भिक्षेकरी सुखावून गेले. दूर देशातून आलेल्या तिबेटियन महिला व पुरुषांनी जपलेल्या या सामाजिक बांधिलकीचे अनेकांनी कौतुक केले. पुरुष भिक्षेकरीगृहास केलेल्या या मदतीबद्धल अधीक्षक शिवाजी खुडे यांनी तिबेटियन विक्रेत्यांचे आभार मानले.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Tibet People Social commitment